ETV Bharat / bharat

पावसाने दडी मारल्याने गोव्यात अनेक ठिकाणी उकाडा

मागील आडवड्यात आलेल्या पावसामुळे पणजी शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. गोव्याच्या अनेक भागात पडझड झाली होती आणि काही ठिकाणी पुराच्या घटना घडल्या होत्या. मात्र, काल पावसाने दडी मारल्यामुळे सर्वत्र ऊन दिसत होते.

उपग्रहाद्वारे घेतलेले छायाचित्र
author img

By

Published : Jul 28, 2019, 9:04 AM IST

पणजी (गोवा) - शुक्रवारी दुपारपर्यंत पडणाऱ्या जोरदार पावसाने रात्रीपासून उसंत घेतली. त्यामुळे नागरिकांना शनिवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत आहे. मागील चोवीस तासात राज्यातील पेडणे येथे सर्वाधिक ९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून म्हापसा, फोंडा येथे पावसाने दडी मारली आहे.

मागील आडवड्यात आलेल्या पावसामुळे पणजी शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर टीकाही झाली होती. गोव्याच्या अनेक भागात पडझड आणि काही ठिकाणी पुराच्या घटना घडल्या होत्या. मात्र, काल पावसाने दडी मारल्यामुळे सर्वत्र ऊन दिसत होते.

हवामानाची माहिती देताना गोवा वेधशाळेचे अधिकारी, डॉ, सानप

एका बाजूला मुंबईच्या उपनगरात पूरस्थिती असताना पश्चिम किनारपट्टीवर असणाऱ्या गोव्यात सकाळपासून पावसाचा टीपुसही दिसला नाही. याबद्दल गोवा वेधशाळेचे पुर्वानुमान अधिकारी, डॉ.एस.डी. सानप यांना विचारले असता ते म्हणाले होते की, कालपर्यंत कोकण आणि गोवा भागात चांगला पाऊस झाला. राज्यातील १३ पैकी ४ ठिकाणी अतिवृष्टी नोंदवली गेली. काल (शनिवारी) दुपारी किवा रात्री पावसाचे परत आगमन होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर मान्सूनचे ढग उत्तरेकडे वेगाने सरकत आहेत. अशावेळी मुंबई परिसरात ढगांची घनता वाढल्याने तेथे अधिक पाऊस होत आहे. शनिवारी गोव्यातही चांगला पाऊस पडेल. त्याचबरोबर काल (शनिवारी) दिवसभर पणजी शहराचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस दरम्यान असण्याची शक्यता, डॉ. सानप यांनी वर्तविली होती.

Intro:पणजी : शुक्रवारी दुपारपर्यंत जोरदार पडणाऱ्या पावसाने रात्री पासून उसंत घेतली आहे. आज सकाळपासून तर चक्क कडक ऊन जाणवत होते. आज सकाळी साडेआइपर्यंत मागील चोवीस तासांत सर्वाधिक 97 मिलीमीटर पावसाची नोंद पेडणे येथे झाली. तर सर्वात म्हापसा, फोंडा पाऊस पडलेला नाही.

Body:मागील आडवड्यात पडणाऱ्या पावसाने पणजी शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर टीकाही झाली. गोव्याच्या अनेक भागांत पडझड आणि काही ठिकाणी पुराच्या घटना घडल्या. आज मात्र, पावसाने दडी मारली त्यामुळे सर्वत्र ऊन दिसत होते.
एका बाजूला मुंबईच्या उपनगरात पूर परिस्थिती असताना पश्चिम किनारपट्टीलर असणाऱ्या गोव्यात पावसाचा सकाळपासून टीपुसही दिसला नाही, याचे कारण जाणून घेण्यासाठी गोवा वेधशाळेचे पुर्वानुमान अधिकारी डॉ. एस. डी. सानप यांना विचारले असता ते म्हणाले की, कालपर्यंत कोकण आणि गोवा भागात चांगला पाऊस झाला आहे. राज्यातील 13 पैकी 4 ठिकाणी अतिवृष्टी नोंदवली गेली आहे. आज दुपारी अथवा रात्री पुन्हा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे.
मान्सूनचे ढग उत्तरेकडे वेगाने सरकत आहेत. अशावेळी मुंबई परिसरात ढगांची घनता वाढल्याने तेथे अधिक पाऊस होत आहे, असे सांगून डॉ. सानप म्हणाले, गोव्यातील आज पाऊस होईल. आज दिवसभर पणजी शहराचे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस दरम्यान असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 1 जून पासून आतापर्यंत गोव्यात 1977.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
.....
बाईट सोबत मान्सुनचा सध्या प्रभाव असलेले दर्शविणारे उपग्रहाद्वारे घेतलेले छायाचित्र आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.