ETV Bharat / bharat

महिला दिन विशेष : स्त्रीरोग तज्ज्ञ शांती राय यांच्या अतुलनीय कामगिरीचा आढावा - etv bharat womens day stories

आरोग्य क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी केलेल्या 13 डॉक्टरांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. यामध्ये बिहारच्या शांती रॉय यांचा समावेश आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण त्यांच्या अतुलनीय कामगिरीचा आढावा घेऊया.

महिला दिन विशेष
महिला दिन विशेष
author img

By

Published : Mar 7, 2020, 8:01 AM IST

पटना - आरोग्य क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी केलेल्या 13 डॉक्टरांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. यामध्ये बिहारच्या शांती रॉय यांचा समावेश आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण त्यांच्या अतुलनीय कामगिरीचा आढावा घेऊया.

डॉ शांती राय ह्या गोपलगंज जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी 1962 साली पटणा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (पीएमसीएच) येथून वैद्यकीय शिक्षण घेतले. पीएमसीएचमधील स्त्री आणि प्रसूती विभागध्यक्षपदी काही काळ काम केले आहे. आपल्या अतुलनीय कामगिरीमुळे त्यांना अनेक पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. पाटणामध्ये 'सर्वेश्रेष्ठ स्त्री रोग तज्ज्ञ' हा पुरस्कारही त्यांना देण्यात आला आहे.

मुल बाळ न होणाऱ्या महिलांचे दु:ख त्या समजून घेतात. तसेच त्यांच्या कौटुंबिक समस्या त्या ऐकतात आणि त्यांचे समुपदेशन करतात. 'कधी-कधी कौटुंबिक समस्याच महिलांच्या आजाराचे कारण असतात. त्यामुळे मी सर्व गोष्टी जाणून घेतल्यानंतर उपचार करते. कधीच पुरस्कार मिळावा म्हणून काम केले नाहीच', असे त्या म्हणाल्या.

मूलबाळ नसलेल्या दाम्पत्यासाठी त्या एक उत्तम सल्लागार म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी सरोगसी आणि इन-विट्रो फर्टिलाइजेशनच्या अनेक समस्या सोडवल्या आहेत. तसेच इतर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टराच्या तुलनेत त्यांचे शुल्क अत्यंत कमी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.