बंगळुरू - कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असून हजारो लोकांचा यामुळे जीव गेला आहे. भारतामध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण थांबवण्यासाठी येत्या १४ एप्रिल पर्यंत देश बंद करण्यात आला असून लोकांना घरामध्येच थांबण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, बंगळुरुमधील इन्फोसिसच्या एका कर्मचार्याने लोकांना कोरोना विषाणूचे संक्रमण पसरवण्यास उद्युक्त केले होते. त्याप्रकरणी शहरातील सिटी क्राइम ब्रँचने त्याला अटक केली आहे.
-
Infosys has completed its investigation on the social media post by one of its employees and we believe that this is not a case of mistaken identity. (1/2)
— Infosys (@Infosys) March 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Infosys has completed its investigation on the social media post by one of its employees and we believe that this is not a case of mistaken identity. (1/2)
— Infosys (@Infosys) March 27, 2020Infosys has completed its investigation on the social media post by one of its employees and we believe that this is not a case of mistaken identity. (1/2)
— Infosys (@Infosys) March 27, 2020
मुजीब मोहम्मद असे त्या व्यक्तीचे नाव आहे. मुजीबने फेसबूक पोस्टच्या माध्यमातून लोकांना घराबाहेर पडण्यास उद्युक्त केले होते. 'चला हात मिळवूया, घरा बाहेर पडून कोरोना विषाणू पसरवूया', या आशयाची त्याने पोस्ट लिहली होती. याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे. बंगळुरुमधील इन्फोसिस सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत असल्याची माहिती सहआयुक्त संदीप पाटील यांनी दिली.
याप्रकरणी इन्फोसिसकडून टि्वट करण्यात आले आहे. 'इन्फोसिसने आपल्या एका कर्मचार्याच्या सोशल मीडिया पोस्टवर तपास पूर्ण केला आहे. संबधित पोस्ट ही इन्फोसिसच्या आचारसंहितेच्या विरोधात आहे. तसेच अशा कृतींबद्दल इन्फोसिसचे शून्य सहिष्णुता धोरण आहे. यानुसार संबधित कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढण्यात आले आहे', असे इन्फोसिस कंपनीने ट्विटरवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी येत्या 14 एप्रिलपर्यंत म्हणजेच 21 दिवस नागरिकांना जेथे आहे, तेथेच घरामध्ये थांबण्यास सांगितले आहे. एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोना विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे लोक घरामध्येच थांबावी, यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, सर्वच लोक 'लॉक डाऊन'चा उद्देश लक्षात घेत नसल्याचे दिसत आहे.