ETV Bharat / bharat

राजस्थान पाठोपाठ गुजरातही हादरलं; राजकोटमध्ये एका महिन्यात १११ अर्भक दगावले

राजस्थानमधील सरकारी रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरण सुरू असताना गुजरातमधूनही धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजकोट जिल्ह्यामध्ये डिसेंबर महिन्यात तब्बल १११ अर्भकांचा मृत्यू झाला आहे.

infant mortality in rajkot
राजकोट रुग्णालय
author img

By

Published : Jan 5, 2020, 12:24 PM IST

गांधीनगर - राजस्थानमधील सरकारी रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरण सुरू असताना गुजरातमधूनही धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजकोट जिल्ह्यामध्ये डिसेंबर महिन्यात तब्बल १११ अर्भकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गुजरात प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

हेही वाचा - मध्यप्रदेशात भिंत कोसळून ५ मजूरांचा मृत्यू, १५ जखमी

मृत्यू झालेल्या १११ अर्भकांपैकी ९६ अर्भके कमी वजनाची आणि वेळेआधीच जन्मलेली होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. अहमदाबाद शहरातील सरकारी रुग्णालय आशिया खंडातील क्रमांक एकचे रुग्णालय समजले जाते, मात्र, या रुग्णालयातही ८५ बालकांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - खळबळजनक : राजस्थानमधील जे. के लोन रुग्णालयात अर्भक मृत्यूंचा आकडा १०७ वर; केंद्रीय आरोग्य पथक दाखल

बिकानेर आणि कोटा जिल्ह्यातील अर्भक मृत्यूमुळे राजस्थानातील वातावरण तापले आहे. बिकानेर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात १६२ अर्भकांचा मत्यू झाला आहे, तर २०१९ वर्षात ६५८ अर्भकांचा मृत्यू झाला आहे. कोटा जिल्ह्यातही डिसेंबर महिन्यात अर्भक मृत्यूचे प्रमाण ११० च्या वर गेले आहे. बालकांच्या होणाऱ्या मृत्यू प्रकरणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक पथक कोटा येथे तपासासाठी पाठवले आहे.

Intro:Body:

गांधीनगर -  राजस्थानमधील सरकारी रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरण सुरू असताना गुजरातमधूनही धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजकोट जिल्ह्यामध्ये डिसेंबर या फक्त एका महिन्यात तब्बल १११ अर्भकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गुजरात प्रशासन खडबडून जागे झाले आहे.    
मृत्यू झालेल्या १११ अर्भकांपैकी ९६ अर्भके कमी वजनाची आणि वेळेआधीच जन्मलेली होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. अमहदाबाद शहरातील सरकारी रुग्णालय आशिया खंडातील क्रमांक एकचे रुग्णालय समजले जाते, मात्र, या रुग्णालयातही ८५ बालकांचा मृत्यू झाला आहे.   
बिकानेर आणि कोटा जिल्ह्यातील अर्भक मृत्यूमुळे देशभरातील वातावरण तापले आहे. बिकानेर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात १६२ अर्भकांचा मत्यू झाला आहे, तर २०१९ वर्षात ६५८ अर्भकांचा मृत्यू झाला आहे. कोटा जिल्ह्यातही डिसेंबर महिन्यात अर्भक मृत्यूचे प्रमाण ११० च्या वर गेले. बालकांच्या होणाऱ्या मृत्यू प्रकरणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक पथक कोटा येथे तपासासाठी पाठवले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.