मुंबई - महामारी सर्व लोकांवर एकाच प्रकारे परिणाम करते. काही अहवाल असे सूचित करतात, की विषाणूचा प्रसार आणि धोरणात्मक प्रतिसादाची कार्यक्षमता याबाबत अनिश्चितता आहे. तरीही, कोविड-१९ मुळे जगाला सुमारे १० ट्रिलियन डॉलर इतकी किंमत मोजावी लागणार आहे.
सर्वाधिक गरीब लोकांना जुनाट आजार असण्याची शक्यता असते, हे लक्षात घेता कोविड-१९शी संबंधित मृत्युदराचा धोका त्यांना सर्वाधिक असतो. संपूर्ण जगभरातील अर्थतज्ञांचे मत असे आहे की, महामारीने आर्थिक संकट आणले असले तरीही, बेरोजगारीचा दर महत्वपूर्णरित्या वाढणार असून, सुरक्षा जाळे कमकुवत झाल्याने आरोग्य आणि सामाजिक असुरक्षेला आणखी धोका निर्माण झाला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, कोविड-१९ चा विषाणू हवेतूनही प्रसार करू शकतो याबाबत सुरूवातीचे काही अहवाल आले आहेत. जगभरातील शास्त्रज्ञांनी याला दुजोरा दिला आहे. अलिकडच्या काही महामाऱ्यांमध्ये, जसे की मध्यपूर्व श्वसनविषयक सिंड्रोममध्ये (मर्स), अपुऱ्या चाचण्या आणि वैयक्तिक संरक्षक साधनांच्या कमतरतेमुळे डॉक्टर्सच आजाराच्या संक्रमणाचे वाहक झाले होते.
तज्ञांचे म्हणणे आहे की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, कारण स्पेन आणि इटालीमध्ये कोविड-१९ च्या प्रकरणांमध्ये एक दशांशाहून अधिक रूग्ण हे डॉक्टर्स होते. २०३० पर्यंत १ कोटी ५० लाख आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची कमतरता भासणार असल्याचे अंदाज असताना, सरकारने या गरजेच्या काळात अत्यावश्यक सेवेतील लोकांना तसेच सोडले आहे.
कथितपणे, कोविड-१९ ला दिला जाणारा असमान्यायी प्रतिसाद अगोदरच स्पष्ट झाला आहे. सुदृढ आयुष्यमान आणि मृत्युदर हा सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरिब यांच्यामध्ये ठळकपणे व्यस्त प्रमाणात असल्याचे दिसले आहे. दुसरीकडे माध्यमांनी दिलेल्या वृत्तांमध्ये असे म्हटले आहे की कोविड-१९चे पूर्ण परिणाम अजून दिसायचे आहेत. मात्र, आता आजार सर्वाधिक धोकादायक भागांमध्ये पसरण्यास सुरूवात झाली आहे. यात संघर्षाचे विभाग, तुरूंग आणि निर्वासित छावण्या यांचा समावेश आहे.
दरम्यान, भारतात कोविड-१९ प्रकरणांची संख्या ५ हजारच्या वर गेली असून १६६ मृत्यू झाले आहेत. जागतिक स्तरावरही हे चित्र असेच गंभीर असून गुरुवारी कोविड-१९च्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १५ लाखांवर गेला आहे.
हेही वाचा : COVID-19 : केरळ आता करणार 'प्लाझ्मा थेरपी'..