नवी दिल्ली - प्रणव मुखर्जी हे इंदिरा गांधींचे अतिशय विश्वासू सहकारी होते. त्याबद्दल बोलताना इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, की 'प्रणवदा यांना एखादी गोपनीय माहिती सांगितल्यास ती त्यांच्या पोटातून कधीच बाहेर पडत नाही. फक्त त्यांच्या तोंडातून बाहेर येतो तो धुम्रपानाचा धूर'
मंत्रिमंडळामध्ये काही वाद निर्माण झाले तर प्रणव मुखर्जींना वाद सोडविण्यासाठी बोलवले जात होते. त्यांना नेहमीच वेगवेगळ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समितीच्या ठरावांचा मसुदा तयार करण्यास आणि वेगवेगळ्या पक्ष समित्यांचे अध्यक्ष करण्यास सांगितले जाईल.
पश्चिम बंगालमधील 'या' गावात जन्म -
प्रणव मुखर्जी हे भारताचे 13 वे राष्ट्रपती होते. त्यांच्या राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ 25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017, असा होता. मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी पश्चिम बंगाल राज्यातील बिरभूम जिल्ह्यातील मिराची या गावात झाला. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जन्म झाल्यामुळे प्रणव मुखर्जी हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील विविध घटनांचे साक्षीदार राहिले आहेत. प्रणव मुखर्जी यांचा प्रवास सामान्य नागरिक ते भारताचे राष्ट्रपती असा राहिला.
प्रणव मुखर्जींचे शिक्षण -
कोलकाता विद्यापीठातून प्रणव मुखर्जी यांनी राज्यशास्त्र आणि इतिहास विषयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याच विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी मिळवळी. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सरकारी कार्यालयात लिपिकाची नोकरी सुरू केली होती. काही दिवसानंतर त्यांनी दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात राज्यशास्त्र विषयाचे अध्यापन सुरू केले होते.
प्रणव मुखर्जींबद्दल काही खास गोष्टी -
- प्रणव मुखर्जींचे वडील कामादिनकर मुखर्जी हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय होते. तसेच ते १९५२ ते १९६४ या काळात बंगाल विधानपरिषदेचे सदस्य देखील होते.
- प्रणव मुखर्जींनी १९६९ मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना काँग्रेसकडून राज्यसभेचे तिकीट दिले होते.
- प्रणव मुखर्जी हे इंदिरा गांधींच्या सर्वात विश्वासू नेत्यांपैकी एक होते. त्यामुळेच त्यांनी १९७३ मध्ये इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवले.
- १९७५ते १९७७ च्या आणीबाणीच्या काळात इतर काँग्रेस नेत्यांप्रमाणे त्यांच्यावर काही आरोप देखील झाले होते.
- प्रणव मुखर्जी हे १९८० पासून १९८५ पर्यंत राज्यसभेचे सभागृह नेते होते.
- प्रणव मुखर्जी हे इंदिरा गांधींचे विश्वासू होते. मात्र, ते राजीव गांधींचा विश्वास संपादन करू शकले नाही. त्यामुळे काही अंतर्गत वाद झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. मात्र, १९८९ मध्येच हा पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये विलिन करण्यात आला.
- १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर मुखर्जींना राजकीय कारकिर्दीने पुन्हा उभारी घेतली. पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात मुखर्जींना नियोजन आयोगाचे अध्यक्ष बनविण्यात आले.
- १९९८ मध्ये सोनिया गांधी यांना पक्षाच्या अध्यक्षपदी बसविण्यात प्रणव मुखर्जी यांची प्रमुख भूमिका होती. तसेच इंदिरा गांधी कशाप्रकारे कार्यभार सांभाळायच्या हे देखील मुखर्जी यांनी सोनिया गांधींना सांगायचे.
- प्रणव मुखर्जी यांना २०११ मध्ये सर्वोत्कृष्ट भारतीय प्रशासक या पुरस्काराने गौरविण्यात आले.
- मुखर्जी हे काही मूठभर राजकारण्यांपैकी एक आहेत, ज्यांनी अर्थमंत्री, संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री हे तिन्ही मंत्रिपद भूषवले आहे. ते उदारीकरणपूर्व आणि उदारीकरणानंतरच्या काळात अर्थसंकल्प सादर करणारे ते एकमेव अर्थमंत्री आहेत.
- मुखर्जी यांनी त्यांनी इंग्रजीसाठी शिकवणी लावून आपले उच्चार सुधारावेत. तसेच बंगाली इंग्रजी बोलणे टाळावे, असा सल्ला इंदिरा गांधी यांनी दिला होता.
- प्रणव मुखर्जींची इंग्रजी भाषेवर चांगली पकड होते. बुद्धीमान, तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींचे अफाट ज्ञान, तसेच संसदीय कामातील प्रभूत्त्व यामुळे ते पक्षात महत्वाचे होते.