ETV Bharat / bharat

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 21 हजार ; तर 681 दगावले

author img

By

Published : Apr 23, 2020, 11:57 AM IST

देशामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल 681 जण दगावले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत.

India's total number of #Coronavirus positive cases rise to 21393

नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाचे रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल 681 जण दगावले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत.

देशातली एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 21 हजार 393 झाला आहे, यात 16 हजार 454 अॅक्टिव्ह केसेस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 4 हजार 257 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 681 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रामध्ये 5 हजार 652 कोरोनाबाधित असून 269 जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 1 हजार 629 कोरोनाबाधित असून 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 2 हजार 407 कोरोनाबाधित असून 103 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिल्लीमध्ये 2 हजार 248 कोरोनाबाधित तर 48 जणांचा मृत्यू झाला आहे. यापाठोपाठ राजस्थानमध्येही 1 हजार 890 कोरोनाबाधित आढळले असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान जगभरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 26 लाख 37 हजार 888 वर पोहोचली आहे. तर 1 लाख 84 हजार 235 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 7 लाख 17 हजार 819 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.