नवीदिल्ली - भारतीय सैन्य अकादमीची (आयएमए) आज पासिंग आऊट परेड पार पडली. यावेळी दक्षिण पश्चिम कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल चेरिश मैथसन यांनी पुनरावलोकनाधिकारी म्हणून परेडच्या सलामीचा स्विकार केला. यावेळी ४५९ तरुण कॅडेट परेडचा भाग बनले.
कॅडेट परेडचा भाग बनलेल्यापैकी ३८२ तरुण भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून सामील होणार आहेत. तसेच उर्वरित अफगाणिस्तान, भूतान, मालदीव, फिजी, मॉरिशस, पापुआ न्यू गिनी, टोंगा, लेसोथो आणि ताजिकिस्तान या ९ मित्र देशांचे ७७ तरुण त्यांच्या देशातील सैन्यात अधिकारी पदावर रूजू होणार आहेत.
सर्वाधिक अधिकारी देणारी १० राज्ये
- उत्तराखंड - ३३
- उत्तर प्रदेश - ७२
- बिहार- ४६
- हरियाणा - ४०
- पंजाब - ३३
- महाराष्ट्र- २८
- राजस्थान - २२
- राजस्थान- २२
- हिमाचल - २१
- दिल्ली - १४
भारतीय सैन्य अकादमीतून पास होऊन बाहेर पडलेले मित्र देशातील कॅडेट्स
- नेपाळ - ७
- अफगाणिस्तान -४५
- भूतान - १५
- फिजी - १
- लेसोथो - १
- मालदीव्हियन - १
- मॉरीशस - २
- पापुआ न्यू गिनी - २
- ताजिकिस्तान - २
- टोंगा - १
एकूण - ७७