नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान बुधवारपासून पाच दिवसीय लष्करी सरावाला सुरुवात होत आहे. यामध्ये दोन्ही देश आपापल्या राफेल विमानांची ताकदही दाखवतील. तसेच, गुंतागुंतीच्या उड्डाणांची प्रात्यक्षिकेही पहायला मिळतील.
चीन-सीमावादाच्या पार्श्वभूमीवर सरावाला महत्त्व..
'एक्स-डेझर्ट नाईट २१' असे या सरावाचे नाव असणार आहे. लडाखमधील सीमावाद सुरू असल्यामुळे सध्या देशातील सर्वच मुख्य लष्करी हवाई तळांवर मोठ्या प्रमाणात लढाऊ विमाने तैनात करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर या लष्करी सरावाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
लढाऊ विमानांसह इतर विमानांचाही समावेश..
या सरावात दोन्ही देशांकडून लढाऊ विमानांसोबतच लष्करी वाहतूक विमाने आणि टँकर एअरक्राफ्ट यांचादेखील समावेश करण्यात येणार आहे. या लष्करी सरावाचा उद्देश्य ऑपरेशनल एक्सपोजर प्रदान करणे आणि लढाऊ क्षमता वाढविण्याच्या दिशेने सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे असा असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
यापूर्वी फ्रान्स आणि भारताच्या लष्करादरम्यान 'गरुडा' सरावाच्या कित्येक फेऱ्या पार पडल्या आहेत. सूत्रांनी सांगितले की, आगामी सराव 'गरुड' मालिकेव्यतिरिक्त असून परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी दोन्ही बाजूंच्या उत्सुकतेचे सूचक आहे. सध्या 'स्कायरोस डिप्लॉयमेंट'अंतर्गत फ्रान्सचे सैन्य आशियामध्ये तैनात करण्यात येत आहे. ते भारतामार्गे जाईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : प्रजासत्ताकदिनी दिसणार 'राफेल'ची ताकद; हवाई प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग