देहराडून : भारत-चीन आणि भारत-नेपाळ सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, लष्कराने उत्तराखंडच्या पिठोरगडमधील सीमा भागात सर्वेक्षण केले. पिठोरगडमधील धारचुला तालुक्याची सीमा या दोन्ही देशांना लागून आहे, त्यामुळे या भागात हाय अलर्ट जारी केला आहे.
२१जूनला इंडो-तिबेटन सीमा पोलीस, सशस्त्र सीमा बल आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांनी लिपुलेख पास, काला पानी आणि नभिधंग भागाला भेट देत; तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, खबरदारी म्हणून याआधीच सशस्त्र सीमा बलाने नेपाळ सीमेवर अधिक जवान तैनात केले आहेत. तसेच गलवान खोऱ्यात झालेल्या प्रकारानंतर लिपुलेख पास भागातही आयटीबीपी आणि भारतीय लष्कर २४ तास गस्त घालत आहे.
नुकतेच नेपाळने आपल्या संसदेत एक विधेयक पारित केले आहे, ज्यामध्ये लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा हे भारतातील भाग आपल्या नकाशामध्ये दाखवले आहेत. या भागाबाबत पूर्वीपासूनच भारत आणि नेपाळदरम्यान वाद सुरू आहे, त्यातच नेपाळने हे पाऊल उचलल्यामुळे या परिसरात हाय अलर्ट जारी केला आहे.
हेही वाचा : 'तुमचे सैनिक झटापटीमध्येही जिंकू शकत नाहीत, मग युद्धाचा विचारच सोडा'; चीनी ड्रॅगनचे फुत्कार!