डेहराडून (उत्तराखंड) - आज (दि. 13 जून) झालेल्या भारतीय सैन्य अकादमीचा पासिंग आऊट परेड सोहळा संपन्न झाला. या परेडमध्ये 423 जवान सहभागी झाले होते. ज्यामध्ये 330 भारतीय कॅडेट्स आणि 90 विदेशी कॅडेट्सचा समावेश होता. यामध्ये सर्वाधिक 66 उमेदवार उत्तर प्रदेश राज्यातील आहेत. तर महाराष्ट्रातील 18 जवान आज पास आऊट होऊन भारतीय लष्करात सहभागी झाले.
आज (दि. 13 जून) सैन्य प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्याकडून या कॅडेट्सना शपथ देण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या समारंभात उमेदवारांच्या कुटुंबीयांना उपस्थित राहता आले नाही. पण, या सोहळ्याचे प्रक्षेपण त्यांचे कुटुंबीयांनी घरबसल्या पाहिले.
कोणत्या देशातील किती उमेदवार..?
यंदाच्या वर्षी इतर देशातील 90 जण भारतीय सैन्य अकादमीतून उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये अफगानिस्तान - 48, भूटान - 13, फिजी - 2, मालदीव - 3, मॉरिशस - 3, पापुआ न्यू गिनी - 1, श्रीलंका - 1, व्हिएतनाम - 1, नेपाळ - 3 आणि तजाकिस्तान येथील 18 जणांचा समावेश आहे.
कोणत्या राज्यातील किती उमेदवार..?
भारतातील विविध राज्यातून 333 उमेदवार भारतीय सैन्य अकादमीतून उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश - 66, हरियाणा -39, उत्तराखंड - 31, बिहार - 31, पंजाब - 25, महाराष्ट्र - 18, हिमाचल प्रदेश - 14, जम्मू कश्मीर - 14, राजस्थान - 13, मध्य प्रदेश - 13, केरळ - 8, गुजरात - 8, दिल्ली - 7, कर्नाटक - 7, पश्चिम बंगाल - 6, आंध्र प्रदेश - 4, छत्तीसगढ़ - 4, झारखंड - 4, मणिपूर - 4, चंडीगढ - 3, आसाम - 2, उडीसा - 2, तमिलनाडू - 2, तेलंगणा - 2, मेघालय, मिझोरम आणि लद्दाख येथून प्रत्येकी एक-एक जणांचा समावेश आहे.
1 ऑक्टोबर, 1932 मध्ये 40 कॅडेट्ससह आयएमएची स्थापना झाली आणि 1934 मध्ये इंडियन मिलिट्री अकादमीची पहली बॅच उत्तीर्ण झाली होती. 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धातील भारतीय सेनेचे के पहले फील्ड मार्शल जनरल सॅम मानेकशॉही या अकादमीचे विद्यार्थी होते. इंडियन मिलिट्री अकादमीतून देश-विदेशतील सैन्यांना 62 हजार 139 तरुण व तडफदार अधिकारी मिळाले आहेत. यात इतर देशातील 2 हजार 413 अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. आयएमएमधून दरवर्षी जून आणि डिसेंबरमध्ये पासिंग आऊट परेडचे आयोजन करण्यात येते.
हेही वाचा -जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा