ETV Bharat / bharat

राफेलचा आज हवाईदलात अधिकृतपणे समावेश, अंबाला हवाईतळावर कार्यक्रम संपन्न

बहुप्रतिक्षीत लढाऊ विमान राफेलचा आज औपचारिकरित्या भारतीय हवाईदलात समावेश झाला आहे. चंदिगडच्या अंबाला हवाईतळावर हा सोहळा संपन्न झाला आहे. राफेलचा समावेश भारतीय हवाईदलातील 17 स्क्वाड्रनमध्ये होणार आहे. त्याला गोल्डन अॅरो नावाने संबोधण्यात येणार आहे.

rafale in india
'गोल्डन अॅरो'... राफेलचा आज हवाईदलात अधिकृतपणे समावेश, अंबाला हवाईपट्टीवर कार्यक्रम
author img

By

Published : Sep 10, 2020, 8:40 AM IST

Updated : Sep 10, 2020, 12:42 PM IST

नवी दिल्ली - बहुप्रतीक्षीत लढाऊ विमान राफेलचा आज औपचारिकरित्या भारतीय हवाईदलात समावेश झाला आहे. चंदिगडच्या अंबाला हवाईतळावर हा सोहळा संपन्न झाला आहे. राफेलचा समावेश भारतीय हवाईदलातील 17 स्क्वाड्रनमध्ये होणार आहे. त्याला गोल्डन अॅरो नावाने संबोधण्यात येणार आहे.

राफेलचा आज हवाईदलात अधिकृतपणे समावेश, अंबाला हवाईतळावर कार्यक्रम संपन्न

अंबाला हवाईतळावर हा कार्यक्रम पार पडत असून यासाठी फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. त्यांच्यासमावेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि हवाईदल प्रमुख राकेशकुमार भदौरिया यांनी हजेरी लावली. तसेच संरक्षण खात्याचे सचिव अजय कुमार हे देखील उपस्थित होते. राफेलचा समावेश करताना सर्वधर्म पूजा करण्यात आली. यावेळी विविध विमानांच्या कसरतींचे सादरीकरण करण्यात आले. तसेच तेजस विमानांसह ‘सारंग'ने हवाई चमूने चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या.

समारंभादरम्यान, संरक्षण मंत्र्यांनी या करारामुळे दोन्ही देशांतील संबंधांना बळकटी मिळल्याचे सांगितले. राफेलचे भारतीय हवाईदलात समावेश होणे याचेच द्योकत असल्याचे त्यांनी म्हटले.

  • Ambala: Defence Minister Rajnath Singh presents induction scroll of Rafale fighter jets to Group Captain Harkeerat Singh, Commanding Officer, 17 Squadron 'Golden Arrows' of the Indian Air Force pic.twitter.com/Vb19HhyPqt

    — ANI (@ANI) September 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

2016 मध्ये भारताने फ्रान्ससोबत 36 राफेल फायटर विमाने खरेदीचा करार केला होता. 60 हजार कोटींचा करार केला होता. त्यातली पहिली पाच विमाने भारताला मिळाली आहेत. पुढच्या दोन ते तीन वर्षात टप्याटप्याने उर्वरित राफेल विमाने भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात साविष्ट करण्यात येणार आहेत.

Last Updated : Sep 10, 2020, 12:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.