कोलकाता (प.बं)- भारतीय रेल्वेने प्रचंड मोठी विद्युतीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार २०२० पर्यंत जगातील सर्वात मोठी १०० टक्के स्वच्छ उर्जा चलित रेल्वे सेवा प्रणाली ही भारताजवळ असणार आहे. अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी आज दिली.
गोयल हे कोलकाता शहरातील पूर्व-पश्चिम भागातील भूमीगत मोट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. तसेच, २० हजार मेगावॉट अक्षय उर्जा निर्मितीसाठी पायभूत सुविधांची उभारणी सुरू आहे. या उर्जेतून देशातील संपूर्ण रेल्वे प्राणाली चालवली जाईल. २०२३ पर्यंत भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठी १०० टक्के विद्युतीकरण झालेली रेल्वे वाहतूक व्यवस्था असेल, अशी माहिती गोयल यांनी दिली.
तसेच, विकसित देशांनी देखील अशा प्रकारचा उपक्रम हाती घेतलेला नाही. पर्यावरन पुरक वाहतूक व्यवस्थेसाठी भारताने प्रयत्न सुरू केले असून याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. तसेच, हा उपक्रम केंद्र शासनाच्या 'ग्रीन नेशन' या अभियानाचा भाग असल्याने तो महत्वाचा आहे, अशी माहिती देखील गोयल यांनी दिली.
हेही वाचा- हिमाचल प्रदेश में अटल सुरंग बनी पर्यटन का नया आकर्षण