ETV Bharat / bharat

'पुढील दहा वर्षात देशात विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचं प्रमाण दुप्पट होईल' - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण

नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल बोलताना जावडेकर म्हणाले की, या धोरणामुळे आता शिकविणे आणि शिकणे आनंददायी अनुभव बनेल. त्यामुळे तरुण आणखी सक्षम बनतील. नव्या शिक्षण धोरणात पायाभूत आणि गणिती साक्षरतेवर भर देण्यात आला असून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग सर्वांना शिक्षण मिळेल, यासाठी प्रयत्न करेल.

Prakash  Javadekar
प्रकाश जावडेकर
author img

By

Published : Sep 5, 2020, 9:52 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० क्रांतिकारक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे. येत्या दहा वर्षात देशात विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे प्रमाण (प्रवेश) दुप्पट होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उच्च शिक्षणाचा देशभरात प्रसार होणार असून प्रामुख्याने ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढतील. तेथे शिक्षणाची मागणीही वाढेल, त्यामुळे प्रवेशाचे प्रमाण वाढेल, असे जावडेकर शिक्षण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते. देशातील विद्यार्थी महात्त्वाकांक्षी झाले असून चांगले शिक्षण घेण्यासाठी पालकांचाही जोर वाढत आहे.

नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल बोलताना जावडेकर म्हणाले की, या धोरणामुळे आता शिकविणे आणि शिकणे आनंददायी अनुभव बनेल. त्यामुळे तरुण आणखी सक्षम बनतील. नव्या शिक्षण धोरणात पायाभूत आणि गणिती साक्षरतेवर भर देण्यात आला असून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग सर्वांना शिक्षण मिळेल, यासाठी प्रयत्न करेल, असे जावडेकर म्हणाले.

यावेळी बोलताना जावडेकर यांनी पूर्व प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व विशद केले. नव्या शैक्षणिक धोरणाचे पूर्व प्राथमिक शिक्षण हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ३ ते ८ वयोगटात बौधिक ज्ञान, कुतूहल आणि मानसिक क्षमता विकसीत होत असल्याचे ते म्हणाले. विषयाच्या सखोल ज्ञानासह शिक्षण गरजेचे आहे. शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात कृतीवर आधारित शिक्षणावर भर दिला पाहिजे. ९ वी ते १२ वीच्या शिक्षणात विषयातील बारकाव्यांवर लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होईल, असे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.