ETV Bharat / bharat

भारत-अमेरिकेचा 'चिनी ड्र‌ॅगन'वर प्रहार, संरक्षणविषयक महत्त्वाच्या करारावर सह्या - BECA news

इंडो-अमेरिका बेसिक एक्सचेंज अ‌ॅन्ड कॉ-ऑपरेशन एग्रीमेंट(BECA) या करारावर सह्या करण्यात आल्या. त्यानुसार दोन्ही देशात सॅटेलाईट छायाचित्रे, गोपनीय माहिती, जीओ स्पॅटिअल इंटेलिजंन्स(पृथ्वीवर घडणाऱ्या गोष्टी, स्थान, वस्तू यांची गोपनीय माहिती) नकाशे या माहितीचे आदानप्रदान होणार आहे.

2+2 inter-ministerial dialogue
भारत अमेरिका चर्चा
author img

By

Published : Oct 27, 2020, 4:55 PM IST

Updated : Oct 27, 2020, 5:44 PM IST

नवी दिल्ली - भारत अमेरिका द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या दिशेने आज (मंगळवार) राजधानी दिल्लीत महत्त्वाच्या घडामोडी झाल्या. अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर आणि परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदींसह भारताचे संरक्षणमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांशी सखोल चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचा सामरिक करार करण्यात आला. जगाला चीनचा असलेला धोका लक्षात घेऊन अमेरिकेने आघाडी उघडली असून भारतानेही हालचाली सुरू केल्या आहेत.

"इंडो-अमेरिका बेसिक एक्सचेंज अ‌ॅन्ड कॉ-ऑपरेशन एग्रीमेंट"(BECA) या करारावर सह्या करण्यात आल्या. त्यानुसार दोन्ही देशात सॅटेलाईट छायाचित्रे, गोपनीय माहिती, जिओ स्पॅटिअल इंटेलिजन्स (पृथ्वीवर घडणाऱ्या गोष्टी, स्थान, वस्तू यांची गोपनीय माहिती), नकाशे या माहितीचे आदानप्रदान होणार आहे. याचा भारताला मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. विशेषत:, भारताची संरक्षण सिद्धता वाढणार आहे. या बैठकीकडे चीन बारीक लक्ष ठेवून होता.

भारत-अमेरिका चर्चा

२ + २ मंत्री स्तरावरील चर्चा

भारत आणि अमेरिकेत परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री स्तरावरील ही तिसरी बैठक होती. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी माईक पॉम्पिओ आणि मार्क एस्पर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी मोदींशी आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशीही चर्चा केली. यानंतर संयुक्त पत्रकार परिषदही घेण्यात आली.

भारत - अमेरिका लष्करी सहकार्य

बेका करारावर सह्या केल्यानंतर संरक्षणमंत्री सिंह यांनी प्रादेशिक एकात्मता आणि सार्वभौमत्त्वतेबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले. 'महत्त्वाच्या विषयावर आम्ही सखोल चर्चा केली. बेका करारावर सह्या होणे ही मोठी घटना आहे. दोन्ही देशांतील लष्करी सहकार्य वाढत आहे. संयुक्तरित्या लष्करी साहित्य तयार करण्यासाठी आम्ही काही प्रकल्प निश्चित केले आहेत. इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी बैठकीत आम्ही निर्धार केला, असे राजनाथ सिंह म्हणाले.

पॉम्पिओ यांचा चिनीवर हल्लाबोल

चिनी कम्युनिस्ट पार्टीच नाही तर, सर्व प्रकारच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी भारत अमेरिकेने सहकार्य वाढविले आहे. मागील वर्षी आम्ही सायबर सुरक्षेच्या मुद्द्यावर काम केले. दोन्ही देशांच्या नौदलाने हिंदी महासागरात युद्धसराव केला. आम्ही भारताच्या युद्ध स्मारकालाही भेट दिली. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी बलिदान देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. गलवान व्हॅलीत चीनबरोबरच्या धुमश्चक्रीत शहीद झालेल्या जवानांनाही श्रद्धांजली वाहिली. भारताच्या सार्वभौमत्वता आणि स्वातंत्र्याला धोका निर्माण झाला असून आम्ही भारताच्या पाठीशी उभे आहोत, असे माईक पॉम्पिओ म्हणाले.

चार देशांचा दौरा

पॉम्पिओ हे चार देशांच्या दौऱ्यावर आहेत. भारतापासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. त्यानंतर ते श्रीलंका, मालदीव आणि इंडोनेशिया या देशांमध्ये जाणार आहेत. या भेटीवरून चीनने अमेरिकेला लक्ष्य केले आहे. चीनविरोधात इंडो पॅसिफिक क्षेत्रातील छोट्या देशांचा पाठिंबा मिळवण्यासाठी अमेरिकेचा प्रयत्न सुरू आहे.

Last Updated : Oct 27, 2020, 5:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.