ETV Bharat / bharat

देशात 4 लाख 46 हजार सक्रिय कोरोना रुग्ण; तर रिकव्हरी रेट 93.81 टक्के

कोरोनाचा प्रसार झाला होता. तेव्हा देशात फक्त कोरोना चाचणी करणारी एकच प्रयोगशाळा होती. मात्र, सध्या देशात तब्बल 2 हजार 165 प्रयोगशाळा आहेत. रविवारी दिवसभरात 38 हजार 772 नवे रुग्ण आढळले असून 443 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्येने 94 लाखाचा आकडा पार केला आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट
author img

By

Published : Nov 30, 2020, 12:28 PM IST

नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. रविवारी दिवसभरात 38 हजार 772 नवे रुग्ण आढळले असून 443 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्येने 94 लाखाचा आकडा पार केला आहे. तर, यात आतापर्यंत 88 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 4 लाख 46 हजार 952 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यनिहाय कोरोनाचा प्रसार पाहता सर्वांत जास्त प्रादुर्भाव महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये झाला आहे.

India tracker: State-wise report
देशातील कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी

देशातील रिकव्हरी रेट 93.81 टक्के आहे. तर 1.45 टक्के मृत्यूदर आहे. आतापर्यंत एकूण 94 लाख 31 हजार 692 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 लाख 37 हजार 139 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी 45 लाख 333 जणांना डिस्चार्ज दिल्यामुळे एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 88 लाख 47 हजार 600 झाली आहे. महाराष्ट्रात सध्या 92 हजार 62 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 47 हजार 71 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रपाठोपाठ केरळमध्ये 64 हजार 719 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाचा प्रसार झाला होता. तेव्हा देशात फक्त कोरोना चाचणी करणारी एकच प्रयोगशाळा होती. मात्र, सध्या देशात तब्बल 2 हजार 165 प्रयोगशाळा आहेत. यात 1 हजार 175 सरकारी आणि 990 खासगी प्रयोगशाळा आहेत. रविवारी 8 लाख 76 हजार 173 कोरोना चाचण्या करण्यता आल्या असून आतापर्यंत तब्बल 14 कोटी 3 लाख 79 हजार 976 चाचण्या झाल्या आहेत.

मोदींकडून कोरोना लस पूर्वतयारीचा आढावा -

कोरोनावरील लसीकडे सर्व जगाचे लक्ष आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील सीरम इंस्टिट्यूटला भेट दिली होती. कोविडची तयार होणारी लस, उत्पादन प्रक्रिया, लस तयार करताना येणारी आव्हाने आणि त्यासंदर्भातील पूर्वतयारीचा एक भाग म्हणून मोदींनी ही भेट दिली. याशिवाय त्यांनी अहमदाबाद येथील जायडस बायोटेक पार्कलादेखील भेट दिली. त्यानंतर हैदराबादेतील भारत बायोटेकला भेट दिली. या तिन्ही ठिकाणी त्यांनी लसींचा विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला. तर, आज ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोविड लस विकसित करण्यात सहभागी असलेल्या तीन टीमसोबत संवाद साधणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार मोदी जेनोवा बायोफर्मा, बायोलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डीज यांच्याशी संवाद साधतील.

हेही वाचा - महाराष्ट्र कोरोना अपडेट : राज्यात आज ५ हजार ५४४ नव्या रुग्णांचे निदान; ८५ रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.