नवी दिल्ली : शांघाय कॉर्परेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) सदस्यांच्या न्यायमंत्र्यांची बैठक येत्या १६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. या बैठकीचे यजमानपद भारताला मिळाले आहे. केंद्रीय कायदेमंत्री रवी शंकर प्रसाद या बैठकीचे आयोजन करतील. एससीओच्या न्यायमंत्र्यांची ही सातवी बैठक असणार आहे.
यासोबतच, १३ आणि १४ ऑक्टोबरला कायदेशीर व्यवहार विभाग हे तज्ज्ञांच्या कार्यकारी समितीची दुसरी बैठक आयोजित करेल. या बैठकीच्या यजमानपदी कायदेशीर व्यवहार विभागाचे सचिव अनूप कुमार मेंडिरत्ता हे असणार आहेत. या बैठकीला तज्ज्ञांच्या कार्यकारी समितीमधील सदस्य कायदा, न्याय आणि सुव्यवस्था या विभागांमधील आपापले अनुभव सांगतील. यासोबतच, विविध प्रकारच्या विवादांचे निराकरण करण्यासाठी त्यांंनी उचललेली पावले यांबाबत ते माहिती देतील.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पद्धतीने पार पडतील.
तर, न्यायमंत्र्यांच्या सातव्या बैठकीत सर्व सदस्य देश विविध प्रकारच्या विवादांचे निराकरण करण्यासाठी, त्यादृष्टीने योग्य असे वातावरण तयार करण्यासाठी आणि यासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात चर्चा करतील. या बैठकीला भारत, कझाकिस्तान, चीन, कुर्गिस्तान, पाकिस्तान ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि रशियन फेडरेशनचे न्याय (कायदा व सुव्यवस्था) मंत्री उपस्थित असतील.
हेही वाचा : सामूहिक प्रतिकारक्षमतेबाबत जागतिक आरोग्य संघटनेने 'हा' दिला इशारा