ETV Bharat / bharat

''कोरोनामुळे 'मेड इन चायना'ला फटका, भारतासाठी ठरू शकते मोठी आर्थिक संधी'' - कोरोना संसर्ग अपडेट

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी कोरोना महामारी आणि त्याच्या जगावर झालेला परिणाम याबाबत चर्चा केली. तसेच सध्याचे वातावरण पाहता जगभरातील देशांकडून चीनला द्वेषाचा सामना करावा लागत आहे. भारताने या द्वेषाच्या राजकारणाकचे रुपांतर आर्थिक संधीमध्ये करून मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूकीला आपल्याकडे आकर्षित केले पाहिजे, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.

नितीन गडकरी
नितीन गडकरी
author img

By

Published : Apr 27, 2020, 11:27 AM IST

नवी दिल्ली - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीमुळे जगभरात चीनकडे द्वेषाने पाहिले जात असून त्यावर दुसरा विकल्प शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारताने याकडे एक सुवर्णसंधी म्हणून पाहावे आणि मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणुकीला आकर्षित करून जागतिक बाजारपेठेत नव्या संधी उघडून द्याव्यात, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी व्यक्त केले. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परदेशात भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. ते म्हणाले, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चीनला संपूर्ण जगभरातून द्वेशाचा सामना करावा लागत आहे. यासोबतच गुंतवणूकीच्या दृष्टीनेदेखील जगभरात चीनचा पर्याय शोधण्याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. "आता सर्व जगाला चीनबद्दल तिरस्कार आहे. ही परिस्थिती भारतासाठी मोठी संधी ठरू शकते, असे ते म्हणाले.

चीनमध्ये गुंतवणूक करणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात तेथून माघार घेतली आहे. चीनमधून बाहेर पडणार्‍या व्यवसायांसाठी जपानने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजचा संदर्भ देताना गडकरी म्हणाले, "मला वाटते की आपण यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. भारताचे दार या गुंतवणूकदारांसाठी उघडायला हवे, जेणेकरून भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विकासाची क्षेत्र उघडू शकतील. ही आपल्यासाठी मोठी संधी आहे, त्यामुळे वेळीच आपण या गुंतवणूकदारांना भारताने आपल्याकडे आकर्षित करायला हवे असे ते म्हणाले.

चीनने कोरोना संसर्गाबाबत जाणूनबुजून "दडपशाही" केल्याचे आढळल्यास भारत चीनविरूद्ध काही कारवाई करू शकते का, असे विचारले असता, हा एक संवेदनशील विषय आहे. यावर परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधान याबाबत विचारविनीमय करून याबाबत योग्य काय ते सांगतील त्यामुळे त्यावर आत्ता भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असेही गडकरी यांनी स्पष्टीकरण दिले.

तसेच, कोरोनामुळे उत्पन्न झालेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी सर्व सरकारी विभाग विशेषत: अर्थ मंत्रालय तसेच भारतीय रिझर्व्ह बँक विविध योजना आखत आहेत. अशा प्रकारे आलेली परकीय गुंतवणूक त्यात मोठी मदत ठरू शकेल. कोरोनानंतरचे आर्थिक युद्ध जिंकण्यासाठी आणि पंतप्रधान मोदी यांचे ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विविध धोरण आखत आहोत. त्याचबरोबर १०० लाख कोटी रुपयांची पायाभूत सुविधादेखील आम्ही तयार करू शकतो, असेही ते यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.