ETV Bharat / bharat

देशात कोरोना रुग्णांची उच्चांकी नोंद ; गेल्या 24 तासांत 38 हजार 902 जणांना संसर्ग - कोरोना रिपोर्ट

नव्याने आढळलेल्या रुग्णांमुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण 10 लाख 77 हजार 618 वर पोहचली आहे. तर यामध्ये 3 लाख 73 हजार 379 सक्रिय रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत उपचारानंतर तब्बल 6 लाख 77 हजार 423 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 26 हजार 816 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे बळी गेला आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 19, 2020, 12:38 PM IST

नवी दिल्ली - भारतामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येचा टप्पा 11 लाखाजवळ पोहचत असून देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासांत आत्तापर्यंतची उच्चांकी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. तब्बल 38 हजार 902 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 543 जणांचा मृत्यू झाला.

नव्याने आढळलेल्या रुग्णांमुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण 10 लाख 77 हजार 618 वर पोहचली आहे. तर यामध्ये 3 लाख 73 हजार 379 सक्रिय रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत उपचारानंतर तब्बल 6 लाख 77 हजार 423 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 26 हजार 816 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे बळी गेला आहे.

देशात कोरोनाचा सर्वांत प्रकोप महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडूमध्ये वाढत आहे. फक्त एकट्या महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ही देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक असून राज्यातील परिस्थिती बिकट आहे. आतापर्यंत 11 हजार 596 मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या 3 लाख 937 वर गेली आहे. यातील एकूण 1 लाख 23 हजार 678 केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर 1 लाख 65 हजार 663 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 1 लाख 21 हजार 582 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 3 हजार 597 जणांचा बळी गेला आहे. या पाठोपाठ गुजरात राज्यात 47 हजार 390 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 122 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 1 लाख 65 हजार 714 कोरोनाबाधित तर 2 हजार 403 जणांचा बळी गेला आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये 1 हजार 108 , पश्चिम बंगालमध्ये 1 हजार 76 तर कर्नाटकमध्ये 1 हजार 240 जणांचा बळी गेला आहे.

भारत बायोटेक निर्मित देशातील कोरोनाची पहिली लस 'कोव्हॅक्सिनचे' क्लिनिकल ट्रायल 375 मनुष्यावर सुरू करण्यात आले आहेत. भारत बायोटेकच्या सुत्रांनी ही माहिती दिली.

देशभरातील कोरोना रुग्णांची स्थिती
देशभरातील कोरोना रुग्णांची स्थिती

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सध्या सात लसी विकासाच्या विविध टप्प्यात आहेत, त्यापैकी दोन लसींना मानवांवर क्लिनिकल चाचण्या सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. भारत बायोटेकने कोरोनावर कोव्हॅक्सिन ही लस विकसित केली आहे. तर अहमदाबादची कंपनी झायडस कॅडिलाने देखील कोरोनाला रोखणारी लस बनवली आहे. कोव्हॅक्सिन आणि झायकोव्ह-डी या दोन्ही स्वदेश लसी आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी या दोन्ही लसींची निर्मिती करण्यात आली आहे. या दोन्ही लसींवर प्रयोग करण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून परवानगी मिळाली आहे.

मानवी चाचणी येत्या 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा आयसीएमआरचा मानस आहे. कोरोनासाठी जगभरात सध्या 145 हून अधिक लसींची निर्मिती करण्यात येत आहे. यांपैकी केवळ 20 लसींना मानवी चाचणी करण्याची परवानगी मिळाली आहे. दरम्यान, नुकतच कोरोनावर लस विकसीत करत असल्याचा दावा उत्तर कोरियाने देखील केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.