ETV Bharat / bharat

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 46 हजार 628 वर

author img

By

Published : Jun 7, 2020, 10:02 AM IST

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 46 हजार 628 झाला आहे, यात 1 लाख 20 हजार 406 अॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 1 लाख 19 हजार 293 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर आतापर्यंत तब्बल 6 हजार 929 जणांचा कोरोनामुळे बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

कोरोना
कोरोना

नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशामध्ये 9 हजार 971 कोरोनाबाधित आढळले असून 287 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाखांच्यापेक्षा अधिक झाला आहे. तर महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत.

भारत हा आता जगातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या क्रमवारीत इटलीला मागे टाकत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 46 हजार 628 झाला आहे, यात 1 लाख 20 हजार 406 अॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 1 लाख 19 हजार 293 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर 6 हजार 929 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील लॉकडाऊन अधिक शिथिल करण्यात आल्याने कोरोनाच्या रुग्णात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यानिहाय स्थिती...

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 82 हजार 968 असून 2 हजार 969 जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 30 हजार 152, दिल्लीमध्ये 27 हजार 654 आणि गुजरात राज्यात 19 हजार 592 कोरोनाबाधित आढळले आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा सर्वाधिक मृत्यू झाला असून त्यापाठोपाठ गुजरातमध्ये 1 हजार 219 व दिल्लीमध्ये 761 जणांचा बळी गेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.