मुंबई - भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील ५ जिल्हात 'रेड अलर्ट' घोषित केला आहे. पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यासाठी २७ आणि २८ रत्नागिरी २७ जुलै आणि मुंबईसाठी २८ जुलैला रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या काळात हवामान खात्याने जोरदार पावसाची होण्याची शक्यता वर्तवली आहे.
भारतीय हवामान खात्याने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, बंगालच्या खाडीत उत्तर-पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे उत्तर कोकणात पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये ५ शहरात पुढील २४ तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे यादरम्यान कमाल तापमान हे २९ अंश तर किमान तापमान २४ अंश असणार आहे.
पुढील २४ तासात समुद्रामध्ये जोरदार वारा सुटणार आहे. हा वारा ४० ते ६० किलोमीटर वेगाचा असणार आहे. यामुळे मच्छीमारांनाही पुढील ४८ तासात समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.