ETV Bharat / bharat

सामाजिक क्षेत्रातील संशोधनासाठी भारत-युरोपीयन संघात महत्त्वाचा करार

author img

By

Published : Oct 28, 2020, 9:54 PM IST

भारत आणि युरोपीयन संघात आधीपासूनच विविध क्षेत्रातील संशोधनाबाबतचे करार झालेले आहेत. मात्र, आता पहिल्यांदा सामाजिक शास्त्र आणि मानव्यविद्या शास्त्रातील संशोधन करारावर सह्या झाल्या आहेत.

file pic
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली - भारत आणि युरोपीयन संघात संशोधन क्षेत्रातील महत्त्वाच्या करारावर सह्या झाल्या आहेत. युरोपीयन संघाचे भारताचे राजदूत एच. ई. वुगो अस्टुटो आणि इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च संस्थेचे (ICSSR) सचिव विरेंद्र कुमार म्हलोत्रा यांनी आज (बुधवार) करारावर सह्या केल्या. व्हर्च्युअली आयोजित कार्यक्रमात युरोपीयन संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

भारतीय संशोधकांसाठी संधी खुल्या

भारतीय संशोधक, संशोधन प्रकल्प हाती घेणारे, फेलोशिप मिळविणारे विद्यार्थांना युरोपीयन संघातील देशांशी मिळून काम करता येणार आहे. युरोपीयन संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

सामाजिक शास्त्र आणि मानव्यविद्या शास्त्रात होणार संशोधन

भारत आणि युरोपीयन संघात आधीपासूनच विविध क्षेत्रातील संशोधनाबाबतचे करार झालेले आहेत. मात्र, आता पहिल्यांदा सामाजिक शास्त्र आणि मानव्यविद्या शास्त्रातील संशोधन करारावर सह्या झाल्या आहेत. विज्ञानाला सीमा नाहीत. जागतिक आणि सामाजिक क्षेत्रातील आव्हाने पेलण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहकार्य गरजेचे असल्याचे भारतातील युरोपीयन संघाचे राजदूत वुगो अस्टुटो म्हणाले.

इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च (ICSSR) ही भारताची अभिमत संस्था आहे. शिक्षण मंत्रालयांतर्गत ही संस्था काम करते. सामाजिक क्षेत्रातील संशोधने संस्थेमार्फत करण्यात येतात. आता युरोपीयन संघाबरोबर करार झाल्यानंतर भारतीय संशोधकांना फायदा होणार आहे. तसेच नव्या संधी खुल्या होणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.