ETV Bharat / bharat

जाणून घ्या देशभरातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...

author img

By

Published : Oct 31, 2020, 5:27 AM IST

देशात आतापर्यंत 73 लाख 73 हजार 375 कोरोना रुग्ण बरे झाले असून यामुळे देशाचा रिकव्हरी रेट 91.15 टक्क्यांवर गेला आहे. तर मृत्यूदर 1.50 टक्के आहे.

india corona update
जाणून घ्या देशभरातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...

नवी दिल्ली - देशात आतापर्यंत 73 लाख 73 हजार 375 कोरोना रुग्ण बरे झाले असून यामुळे देशाचा रिकव्हरी रेट 91.15 टक्क्यांवर गेला आहे. तर मृत्यूदर 1.50 टक्के आहे. सध्या देशभरात 5 लाख 94 हजार 386 ऑक्टिव्ह रुग्ण असून मागील काही दिवसांमध्ये तामिळनाडू, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने राज्य सरकारांच्या चिंतेत भर पडलीय.

हैदराबाद

आरोग्य सेवांमध्ये कमीतकमी व्यत्यय येण्याचे सुनिश्चित करताना कोरोनावरील लसीसंदर्भात समन्वय साधण्यासाठी व त्याची देखरेख करण्यासाठी कमिटी नेमण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. तसेच लोकांमध्ये लसीबाबत कोणताही संभ्रम राहू नये, यासाठी विविध माध्यमांतून मागोवा घेण्याचे केंद्राने सांगितले आहे.

केंद्र सरकारने देशातील कोरोना चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सध्या त्याचा दर 10.65 टक्के आहे.

नवी दिल्ली

दिल्लीचे राज्यपाल अनिल बैजल यांनी राज्यातील परिवहन बसेस पूर्ण क्षमतेने सुरू करायला परनावगी दिली आहे. दिल्ली राज्य सरकारने कोरोनाची परिस्थिती चिघळत असतानाही हा प्रस्ताव दिला होता. राज्यपालांनीही त्याला हिरवा कंदील दाखवला आहे. सध्या या बसेस 20 प्रवासी घेऊन प्रवास करत आहेत. मात्र लवकरच त्या पूर्ण क्षमतेने सुरू होतील. बैजल हे दिल्लीच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संचालक पदावर आहेत. यापुढे राज्य परिवहन सोबतच आंतरराज्य बससेवा सुरू करण्यासाठी परनावगी देण्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुढील आठवड्यात यासंबंधी निर्णय देण्यात येणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून मिळत आहे.

महाराष्ट्र

मुंबई उच्च न्यायालयाने एका खटल्यादरम्यान मुंबई पोलिसांना शाबासकी दिली आहे. कोरोनाच्या काळातही पोलीस कर्मचारी मोठ्या दबावाखाली काम करत आहेत. त्यामुळे त्यांना लोकांच्या सहकार्याची गरज आहे, असे न्यायालयाने सांगितले.

औरंगाबादमधील सिव्हिल रुग्णालयात कोरोना झाल्यानंतरची काळजी घेण्यासंबंधी सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.

कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गुरुवारी महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनची तारीख 30 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे, राज्य सरकार टप्प्याटप्प्याने निर्बंध कमी करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.