ETV Bharat / bharat

COVID-19 : देशातील रुग्णांचा आकडा आठ हजारांवर, आतापर्यंत कोरोनाचे २७३ बळी.. - भारत कोरोना बळी

गेल्या २४ तासांमध्ये देशात ९०९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८,३६५ वर पोहोचली आहे. राज्यनिहाय आकडेवारी पाहता महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रानंतर दिल्लीनेही हजार रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे.

India corona cases cross eight thousand mark as 909 cases reported on saturday
COVID-19 : देशातील रुग्णांचा आकडा आठ हजारांवर, आतापर्यंत कोरोनाचे २७३ बळी..
author img

By

Published : Apr 12, 2020, 9:35 AM IST

नवी दिल्ली - काल दिवसभरात सलग दुसऱ्या दिवशी जवळपास हजार रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासांमध्ये देशात ९०९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८,३६५ वर पोहोचली आहे. राज्यनिहाय आकडेवारी पाहता महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रानंतर दिल्लीनेही हजार रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे.

यातील ७,३६७ रुग्ण अ‌ॅक्टिव आहेत. तर, ७१६ जण पूर्णत: बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये देशात ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या बळींची संख्या २७३ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.

  • 34 deaths and 909 new cases reported in last 24 hours; India's total number of #Coronavirus positive cases rises to 8356 (including 7367 active cases, 716 cured/discharged/migrated and 273 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/3S1UvXQ1Hc

    — ANI (@ANI) April 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १,७६१ वर पोहोचला आहे. दिल्लीमध्ये १,०६९ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, तामिळनाडूमध्ये ९६९ रुग्ण आढळले आहेत. तसेच, महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही सर्वाधिक आहे. महाराष्ट्रामध्ये १२७, त्यापाठोपाठ मध्य प्रदेशमध्ये ३६, तर गुजरातमध्ये २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : तेलंगणात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहणार - मुख्यमंत्री केसीआर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.