ETV Bharat / bharat

भारत-चीन सीमावाद : आज पार पडणार ब्रिगेड कमांडर लेव्हलची बैठक

२९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री पूर्व लडाखमधील पँगाँग लेकच्या दक्षिणेस चीनी सैन्याच्या हालचाली अचानक वाढल्या होत्या. सीमेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न चीनी लष्कराने केला. मात्र, भारतीय सैन्याने त्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला. चीनने आता भारतानेच घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे. यावर तोडगा काढण्यासाठीच आज सकाळी दहाच्या सुमारास ब्रिगेड कमांडर लेव्हलची बैठक पार पडणार आहे...

India-China border tension: Brigade commander level talks today
भारत-चीन सीमावाद : आज पार पडणार ब्रिगेड कमांडर लेव्हलची बैठक
author img

By

Published : Sep 2, 2020, 9:37 AM IST

नवी दिल्ली - पँगॉंग तलावाच्या दक्षिणेकडील भागातील परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी ब्रिगेड कमांडर लेव्हलची बैठक बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास पार पडणार आहे. चुशुल/मोल्दो याठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. मंगळवारीही दोन्ही देशांच्या ब्रिगेड कमांडर्समध्ये चर्चा पार पडली होती.

पूर्व लडाखमधील भारत चीन सीमेवर मागील काही महिन्यांपासून परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर दोन्ही देशाचे सैन्य आमनेसामने ठाकले आहेत. दोन्ही देशांमध्ये सीमावादासंबंधी लष्करी कमांडर स्तरावर चर्चा सुरू आहे. मात्र, चीनच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे चर्चेचे घोंगडे भिजत पडले आहे. सीमारेषेवरील वादावर अंतिम तोडगा निघाला नसतानाही २९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री पूर्व लडाखमधील पँगाँग लेकच्या दक्षिणेस चिनी सैन्याच्या हालचाली अचानक वाढल्या होत्या. सीमेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न चीनी लष्कराने केला. मात्र, भारतीय सैन्याने त्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला. चीनने आता भारतानेच घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, नियंत्रण रेषेवरील सैन्याला चीनने आवर घालावा, अशी विनंती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी मंगळवारी चीनच्या आक्रमक भूमिकेवर वक्तव्य केले. ते म्हणाले, "नुकतेच चीनने सीमेवर आक्रमक धोरण स्वीकारत घुसखोरीचा प्रयत्न केला. ही बाब राजनैतिक आणि लष्करी स्तरावरून चीनपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. चिनी सैन्याने सीमेवर शिस्त बाळगावी आणि कोणतीही भडकाऊ कृती करू नये."

हेही वाचा : नियंत्रण रेषेवरील सैन्याला चीनने आवर घालावा - भारतीय परराष्ट्र मंत्रालय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.