पाटणा - बिहार विधानसभा निवडणूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून राज्यात निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बिहार काँग्रेसचे मुख्यालय सदाकत आश्रमात प्राप्तीकर विभागाने छापा टाकला आहे.
दरम्यान, या ठिकाणी गाडीतून पैसै मिळाले असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यालयाबाहेर एक गाडी उभी होती. ज्यामधून १० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.