उज्जैन - लॉकडाऊनमुळे केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर बाबा महाकालही अडचणीत आले आहेत. या महामारीदरम्यान संसर्ग रोखण्यासाठी मंदिरेही बंद केली गेली आहेत. यामुळे, बाबा महाकाल यांची दरमाही होणारी कमाई करोडोंमधून थेट लाखात आली आहे. दरमाही 2 करोडच्या आसपास कमाई करणाऱ्या महाकालेश्वर मंदिरात 21 मार्च ते 29 एप्रिलदरम्यान केवळ 3 लाख 33 हजार रुपये जमा झाले आहेत.
लॉकडाऊनमुळे एकीकडे सामान्य नागरिकांसमोर रोजच्या गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे. तर, दुसरीकडे मोठ्या मंदिरांसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चासाठीही पैसे कमी पडत आहेत. प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराचीदेखील हीच व्यथा आहे. मंदिरासाठी प्रत्येक महिन्याला एक करोडहून अधिक खर्च करावा लागतो. मात्र, सध्या केवळ लाखामध्ये पैसे जमा होत आहेत.
गेल्या 56 दिवसात महाकाल मंदिरात ऑनलाईन दानद्वारे 3 लाख 33 हजार जमा झाले आहेत. या मंदिरात जवळपास 650 कामगार वेगवेगळ्या प्रकारची कामे करतात. त्यांचा दर महिन्याचा पगार आणि इतर खर्च मिळून एक ते सव्वा लाख रुपये महिन्याला खर्च होतात. अशात गेल्या दोन महिन्यांपासून मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने मंदिर प्रशासनासमोर मोठी समस्या उभी ठाकली आहे.
मार्च महिन्यात मंदिरात जमा झालेले पैसे -
Rs. 1,22,569.95Rs. 101.42 dated 20/03/20
Rs. 53,055.63 dated 21/03/20
Rs. 2,794.76 dated 22/03/20
Rs. 6,181.70 dated 24/03/20
Rs. 2,442.16 dated 26/03/20
Rs. 2,442.30 dated 27/03/20
Rs. 2,752.88 dated 29/03/20
Rs. 32,045.88 dated 30/03/20
Rs. 20,753.22 dated 31/03/20
एप्रिल महिन्यातील दान केलेल्या पैशांचा आकडा -
Rs. 6,634.82 dated 01/04/20
Rs. 7,618.92 dated 02/04/20
Rs. 9,989.98 dated 03/04/20
Rs. 5,054.10 dated 05/04/20
Rs. 22,734.04 dated 06/04/20
Rs. 2,860.72 dated 07/04/20
Rs. 1,848.22 dated 08/04/20
Rs. 8006.16 dated 09/04/20
Rs . 2127.52 dated 10/04/20
Rs. 1027.60 dated 11/04/20
Rs. 6450.78 dated 12/04/20
Rs. 21825.06 dated 13/04/20
Rs. 2257.36 dated 14/04/20
Rs. 2685.75 dated 15/04/20
Rs. 1849.60 dated 16/04/20
Rs. 1856.48 dated 17/04/20
Rs. 695.18 dated 21/04/20
Rs. 1369.86 dated 23/04/20
Rs. 76802.14 dated 26.04.20
Rs. 23782.12 dated 27/04/20
Rs. 1849.96 dated 28/04/20
Rs. 2235.32 dated 29/04/20
एप्रिल महिन्यात मंदिराच्या दानपेटीत केवळ 2 लाख रुपये जमा झाले आहेत. 650 कामगारांचा पगार, वीज बिल, अन्नधान्याचा खर्च, साफ सफाई, मंदिरातील पुजेसाठी लागणारे साहित्य यावरच करोड रुपये खर्च होत असल्याने व्यवस्था डगमगली आहे. एकंदरीतच या लॉकडाऊनचा परिणाम फक्त माणसांवरच नाही, तर देवांवरही झाला आहे.