वायनाड - केरळच्या वायनाड जिल्ह्यामध्ये प्रथमताच 'मल्टी स्पेशालिटी टेलीमेडिसिन ' सेवा सुरू करण्यात आली आहे. याला 'कूडे' हे नाव देण्यात आले आहे. ही सेवा केरळच्या शासकीय वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या नेतृत्वात वैद्यकीय विशेष समितीतील विविध विभागांच्या सहकार्याने सुरू करण्यात आली आहे.
वायनाडच्या जिल्हाधिकारी डॉ. अधीला अब्दुल्ला यांनी गुरुवारी 'कूडे' या टेलीमेडिसिन सेवेचे पोस्टर लाँच केले. या सेवेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी सामान्य आजारांविषयी तसेच विशेष आजारांविषयीसंबंधी औषध सल्ला आणि विशेष सल्ला देण्यात येणार आहे.
एखाद्या रुग्णाला त्याच्या आजाराशी संबंधित लक्षणे व तपशीलांबद्दल दूरध्वनीद्वारे वैद्यकीय अधिकाऱ्यांशी विचारपूस करता येणार आहे. तसेच, रुग्णाने सांगितलेल्या लक्षणांवरुन संबधित डॉक्टर हे रुग्णांशी दूरध्वनीच्या माध्यमातून संभाषण करून रुग्णाच्या प्रकृतीबद्दल माहिती घेतील. त्यानंतर, रुग्णाने सांगितलेल्या आजारासंबधी माहितीच्या आधारे डॉक्टर पुढील उपचारासंबंधी मार्गदर्शन करतील.
ज्या नागरिकांवर सतत उपचार सुरू आहे. एखाद्या विशिष्ट आजारावर ते फार आधीपासून उपचार करत आहेत. अशा नागरिकांची सखोल माहिती घेऊन त्यांना ईमेल किंवा व्हाट्सअॅपच्या माध्यमातून संबंधित प्रिस्क्रिप्शन पाठवले जाते. त्या प्रिस्क्रिप्शनच्या आधारे रुग्ण जवळच्या मेडिकलमध्ये जाऊन औषधे विकत घेऊ शकतो. याव्यतिरिक्त, गंभीर आजार असलेले रुग्णही त्यांच्या उपचारासंबंधी फॉलोअप आणि औषधोपचारांबद्दल डॉक्टरांकडून या सुविधेचा वापर करू मार्गदर्शन घेऊ शकतात.