ETV Bharat / bharat

जगभर थैमान घालणारा कोरोना विषाणू पाहिलात का?  भारतीय शास्त्रज्ञांनी लावला शोध - image of COVID19

जगभरामध्ये कोरोनाविषाणूने थैमान घातले असून भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 800 पेक्षा अधिक झाली आहे. कोरोना विषाणूचे सूक्ष्म छायाचित्र मिळवण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे.

microscopy image of SARS-CoV-2 virus
microscopy image of SARS-CoV-2 virus
author img

By

Published : Mar 28, 2020, 9:01 AM IST

Updated : Mar 28, 2020, 9:50 AM IST

नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोनाविषाणूने थैमान घातले असून भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 800पेक्षा अधिक झाली आहे. कोरोना विषाणूवर उपचार शोधण्यासाठी चीन, अमेरिकेमधील शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. कोरोना विषाणूचे सूक्ष्म छायाचित्र मिळवण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे.

भारतीय शास्त्रज्ञांनी मायक्रोस्कोपद्वारे (सूक्ष्मदर्शकयंत्र) एसएआरएस-सीओव्ही -2 (COVID19) विषाणूचे छायाचित्र घेतले आहे. इंडियन जरनल ऑफ मायक्रोबायोलॉजी रिसर्चच्या (IJMR) अंकात ही माहिती देण्यात आली आहे.

चीनमधील वूहानमधून परतेल्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आल्यानंतर केरळमध्ये 30 जानेवारीला भारतामधील पहिला कोरोनाबाधित रुग्ण समोर आला होता. त्या रुग्णाच्या गळ्यातील द्रवाचे नमुने शास्त्रज्ञांनी घेतले होते. त्या नमुन्यातून हे छायाचित्र मिळवण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गावर अद्याप औषध सापडलेले नाही. जगभरातील शास्त्रज्ञ संशोधनात गुंतले आहेत. भारतीय शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूचे छायाचित्र काढल्याने औषधासाठी पुढील संशोधनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Last Updated : Mar 28, 2020, 9:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.