ETV Bharat / bharat

अमेरिकी वृत्त वाहिनीशी बोलताना इम्रान खान भरकटले; कोरोनाएवजी काश्मीरवर केली चर्चा - imran khan pakistan

अमेरिकी वृत्त वाहिनीशी बोलताना इम्रान खान यांनी भारतातील वाढत्या हिंदू-मुस्लीम संघर्षाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. भारतात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील हिंदू विचारधारा प्रणित सरकार कोट्यवधी लोकांना नागरिक्तवापासून वंचित ठेवण्याची धमकी देत आहे, असे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले.

corona pakistan
इम्रान खान
author img

By

Published : Mar 17, 2020, 11:45 PM IST

हैदराबाद(पाकिस्तान)- जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला असून या विषाणूमुळे हजारो लाकांनी जीव गमवला आहे. मात्र, पाकिस्तानला या विषाणूची काडी मात्र पर्वा नसल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्यावरूण दिसून आले आहे. एका अमेरिकी वृत्त वाहिनीशी बोलताना इम्रान खान यांनी कोरोना आणि त्याचे जागतिक परिणाम या ठरलेल्या विषयावर न बोलता भारातातील काश्मीर आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात टीका केली आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

अमेरिकी वृत्त वाहिनीशी बोलताना इम्रान खान यांनी भारतातील वाढत्या हिंदू-मुस्लीम संघर्षाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील हिंदू विचारधारा प्रणित सरकार कोट्यवटी लोकांना नागरिकत्वापासून वंचित ठेवण्याची धमकी देत आहे, असे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले. त्याचबरोबर, एक कट्टर जातीयवादी पार्टी जी वांशिक श्रेष्ठतेवर विश्वास ठेवते, जीचे १०० कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशावर नियंत्रण आहे, हे जगातील सगळ्यात भयंकर स्वप्न असून ते आता प्रत्यक्षात उतरले आहे. मी नरेंद्र मोदी यांच्यापासून असलेल्या धोक्याबद्दल जगाला अवगत करण्यासाठी सयुक्त राष्ट्रसंघातदेखील गेलो होते, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मागच्या वर्षी भारताने काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवले होते. त्यानंतर पाकिस्तान आणखीनच चवताळला आणि दोन्ही देशातील संबंध आणखीनच बिघडले.

हेही वाचा-नौदलात महिला कमिशन निर्माण करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.