ETV Bharat / bharat

फोन पे चर्चा : काश्मीरच्या मुद्यावरून इम्रान खान यांचा डोनाल्ड ट्रम्पंना फोन - राष्ट्राध्यक्ष

पाकिस्तान पुरता बिथरला असून चीननंतर आता अमेरिकेला काश्मीर मुद्यावर मध्यस्थी करण्याची विनवणी करीत आहे.

फोन पे चर्चा : डोनाल्ड ट्रम्प यांना काश्मीरच्या मुद्यावरून इम्रान खानचा फोन
author img

By

Published : Aug 16, 2019, 10:09 PM IST

इस्लामाबाद - जम्मू काश्मीरचे विभाजन आणि ३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तान पुरता बिथरला आहे. चीननंतर आता पाकिस्तान अमेरिकेला मध्यस्थी करण्याची विनवणी करीत आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये आज काश्मीर मुद्यावर चर्चा झाली. यासंबधी इम्रान खान यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवर संभाषण केल्याची माहिती आहे.

इम्रान खान यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे संदर्भात विश्वासात घेतले आहे. इम्रान खान अनेक देशांच्या संपर्कात असून काश्मीर प्रश्नावर जागतिक पाठबळ मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे पाकिस्तानचे परारष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्राच्या स्थायी सदस्य असलेल्या चीनने काश्मीर मुद्यावर बैठक घेण्याची मागणी केली. याचबरोबर पाकिस्तानचे परारष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेचे अध्यक्षा जोआना व्रोन्चीका यांना काश्मीर प्रश्नी तातडीने बैठक घेण्याची मागणी केली होती. तसे पत्र पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र परिषदेला लिहले होते.

काश्मीरप्रश्नी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतविरोधात आघाडी उघडली आहे. मात्र, आत्तापर्यंत एकाही देशाने पाकिस्तानच्या बाजूने उघडपणे पाठिंबा दिला नाही. भारताच्या निर्णयामुळे काश्मीरसह आशिया खंडामधील शांतता धोक्यात येईल असा कांगावा पाकिस्तान करत आहे.

Intro:Body:

mayu

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.