ETV Bharat / bharat

वाचा एका क्लिकवर : काय होणार आज दिवसभरात.. - आजच्या महत्त्वाच्या घटना

आज दिवसभरातील या घटनांवर विशेष लक्ष राहील...

important news events to look for today
वाचा एका क्लिकवर : काय होणार आज दिवसभरात..
author img

By

Published : Dec 24, 2020, 5:35 AM IST

  • रयत क्रांती संघटना आणि भाजपाच्या किसान आत्मनिर्भर यात्रेला होणार सुरूवात..
    important news events to look for today
    रयत क्रांती संघटना आणि भाजपाच्या किसान आत्मनिर्भर यात्रेला होणार सुरूवात..

रयत क्रांती संघटना आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रेला आज सुरूवात होणार आहे. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्त्वात ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. तर माजी मंत्री आणि आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते या यात्रेचा शुभारंभ सांगलीच्या किल्लेमच्छिंद्रगड येथून होणार आहे.

  • किरण रिजिजू आज औरंगाबादमध्ये; जलतरण तलाव आणि हॉकी मैदानाचे करणार उद्घाटन..
    important news events to look for today
    किरण रिजिजू आज औरंगाबादमध्ये; जलतरण तलाव आणि हॉकी मैदानाचे करणार उद्घाटन..

केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आज औरंगाबामध्ये असणार आहेत. शहरातील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्राच्या सेंटर ऑफ एक्सलन्समधील नव्या सुविधांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. यावेळी ते आंतरराष्ट्रीय प्रतीचा जलतरण तलाव, आणि हॉकी मैदानाचेही उद्घाटन करतील.

  • नितीन गडकरींच्या हस्ते राजस्थानमध्ये ८ हजार कोटींच्या महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन..
    important news events to look for today
    नितीन गडकरींच्या हस्ते राजस्थानमध्ये ८ हजार कोटींच्या महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन..

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज राजस्थानमध्ये नव्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. यामध्ये ८, ३४१ कोटी रुपयांच्या महामार्ग प्रकल्पांचा समावेश असणार आहे.

  • स्पाईसजेटचीही आता मुंबई ते माले सेवा..
    important news events to look for today
    स्पाईसजेटचीही आता मुंबई ते माले सेवा..

स्पाईसजेट या विमान कंपनीची मुंबई ते माले सेवा आजपासून सुरू होत आहे. मालदीवाला जाण्यासाठी सुरूवातीला आठवड्याला एक फ्लाईट असणार आहे, तर काही दिवसांनी फ्लाईट्सची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. यासाठी जाण्याचे तिकीट ९ हजार रुपये तर येण्याचे ९ हजार ५०० रुपये असणार आहे.

  • शेतकरी आंदोलनाचा २९वा दिवस..
    important news events to look for today
    शेतकरी आंदोलनाचा २९वा दिवस..

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा आज २९वा दिवस आहे. हे कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी गेल्या २८ दिवसांपासून हे शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्यांना देशभरातून पाठिंबा मिळत असून, आता भारतीय सेनेतील सेवानिवृत्त कर्नलही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

  • राहुल गांधी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांसह घेणार राष्ट्रपतींची भेट..
    important news events to look for today
    राहुल गांधी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांसह घेणार राष्ट्रपतींची भेट..

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दोन कोटी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्याची मोहीम काँग्रेसने हाती घेतली होती. या स्वाक्षऱ्यांसह काँग्रेस नेते राहुल गांधी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते केंद्राने लागू केलेले कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करतील.

  • बीसीसीआयची सर्वसाधारण वार्षिक सभा..
    important news events to look for today
    बीसीसीआयची सर्वसाधारण वार्षिक सभा..

बीसीसीआयची सर्वसाधारण वार्षिक सभा आज अहमदाबादमध्ये पार पडणार आहे. यावेळी भारतीय क्रिकेट संघाबाबत महत्त्वाची चर्चा होऊ शकते. तसेच, २०२१च्या आयपीएलबाबतही चर्चा होणार आहे.

  • विश्वभारती विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाला मोदी राहणार उपस्थित..
    important news events to look for today
    विश्वभारती विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाला मोदी राहणार उपस्थित..

पश्चिम बंगालमधील विश्वभारती विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाला आज पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यक्रमाला संबोधित करतील.

  • आज भारतात प्रदर्शित होणार 'वंडर वुमन १९८४'..
    important news events to look for today
    आज भारतात प्रदर्शित होणार 'वंडर वुमन १९८४'..

बहुप्रतिक्षित असा वंडर वुमन १९८४ हा चित्रपट आज भारतात प्रदर्शित होणार आहे. डीसी फिल्म्सच्या वंडर वुमन या चित्रपटाचा हा सिक्वल असणार आहे. हॉलिवूड स्टार गॅल गॅडोट हिने यामध्ये वंडर वुमन हे कॉमिकबुक सूपरहीरो कॅरेक्टर साकारले आहे.

  • राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन..
    important news events to look for today
    राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन..

आजचा दिवस हा राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. १९८६मध्ये २४ डिसेंबरला ग्राहक हक्क कायद्याला मंजूरी मिळाली होती. तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो. या कायद्यान्वये ग्राहकाला सुरक्षेचा हक्क, माहितीचा हक्क, निवडीचा अधिकार, म्हणणे मांडण्याचा हक्क, तक्रार निवारणाचा हक्क आणि ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार असे सहा हक्क मिळाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.