बंगळुरू - कर्नाटक राज्यातील आयएमएच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात फसवणूक करणारा मन्सूर अली खान याला ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. शहर पोलीस आयुक्त आलोक कुमार यांच्या आदेशावरून त्याला उच्च दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. त्याला २३ जुलैपर्यंत शांतीनगरजवळ येथील ईडीच्या कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.
ईडीने मन्सूरच्या केलेल्या चौकशीत घोटाळ्याशी संबंधित त्याने अनेक सत्य माहिती सांगितली आहे, असे सांगण्यात येत आहे. शहर पोलीस आयुक्त आलोक कुमार यांच्या आदेशावरून त्यांना उच्च दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी मन्सूरकडून चौकशीत १००० कोटींहून अधिक व्यावसायिक माहिती असलेला डाटा प्राप्त केला आहे. आएमएच्या नफ्यावरील अहवालात काही प्रभावशाली व्यक्तींचे नाव नमूद करण्यात आली असल्याचे त्याने चौकशीत म्हटले आहे. त्याच्या प्रारंभिक करण्यात आलेल्या चौकशीत या प्रकरणात अनेक लोक गुंतल्याचे ईडीला माहीत झाले आहे.