पणजी - संगीतामधून जगण्याचा आनंद मिळवता येतो. माणसाला संयमी राहण्यास संगीत शिकवते. त्यामुळे जर प्रत्येक शाळेत संगीत शिकवले, तर हिंसाचाराचे प्रमाण कमी होईल, असे मत प्रसिद्ध संगीतकार इल्लैया राजा यांनी व्यक्त केले आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) राजा यांनी 'मास्टरक्लास' मध्ये रसिकांशी संवाद साधला.
हेही वाचा - 'द बॉडी': 'झलक दिखलाजा'च्या रिक्रियेटेड व्हर्जनसाठी इमरान - हिमेश पुन्हा एकत्र
यावेळी राजा म्हणाले, संगीत प्रेक्षकांना चित्रपटाकडे खेचते, हीच त्याची ताकद आहे. जेव्हा संगीत ध्वनीमुद्रीत केले जाते, तेव्हा प्रत्यक्ष पडद्यावरील कलाकाराच्या मनातील गुंतागुंत मोजक्या शब्दांत मांडण्याचे काम संगीतकार करतो. जेव्हा संगीत प्रत्यक्ष उतरवले जात नाही तेव्हा ते कोठे असते? असा सवाल करत ते म्हणाले, चित्रपटात संवादाला कमी करण्यासाठी त्याच्या जागी पार्श्वसंगीत वापरले जाते.
हेही वाचा - 'अखियों से गोली मारे' गाण्याची सोशल मीडियावर क्रेझ, व्हिडिओ शेअर करून कार्तिकने मानले आभार
एखाद्या प्रसंगानुरूप कशाप्रकारे संगीत तयार केले जाते. त्याचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखवले. तसेच वाद्याचा वापर कसा करायचा हेही सांगितले. आर. बाल्की यांनी इलैया राजा यांच्याशी संवाद संवाद साधत अनेक आठवणींना उजाळा दिला. पार्श्वसंगीत कशाप्रकारे तयार करतो, याचे गमकही त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर प्रेक्षकांच्या मागणीवरून ' ऐ जिंदगी गले लगाले' या बरोबरच तमिळ चित्रपटातील काही गीतांचे मुखडे सादर केले. तसेच उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.