रुड़की - आयआयटी रुडकी येथील संशोधकांनी कोरोना विषाणूचा रुग्ण आपल्यापासून किती लांब आहे, हे शोधणारे तंत्र विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे पोलीस आणि प्रशासनाला कोरोनाचे रुग्ण शोधण्यास मदत होईल.
आयआयटी रुडकी येथील सिव्हिल इंजीनियरिंग विभागातील प्राध्यापक डॉ. कमल जैन यांनी एक खास ट्रॅकिंग मोबाईल ऍप्लिकेशन बनवले आहे. या ॲपद्वारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ट्रॅक करता येईल.
जर कोणाच्या मोबाईल मधील जीपीएस डेटा उपलब्ध होत नसेल तर त्याच्या लोकेशन वरून मोबाईल टॉवरच्या ट्राईन्ग्युलेशन द्वारे माहिती मिळू शकते. तसेच त्या उपकरणांवर संदेश पाठवून त्या व्यक्ती बद्दल माहिती मिळवली जाऊ शकते.
या ॲप मध्ये क्वारंटाइन व्यक्ती राहत असलेले ठिकाण तसेच त्यांचे फोटो सर्व गूगल मॅपवर साठवून ठेवण्याची अनुमती देण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या संदर्भातील रिपोर्ट देखील पाहता येईल. कोरोना रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर याबद्दलची माहिती देण्यात येईल.
या ॲपमुळे क्वारंटाइन सुविधा अधिक सुरक्षित बनवण्यास मदत तर होईलच. त्याशिवाय प्रशासनाला देखील गर्दी कमी करण्यासाठी उपयोगी पडेल. संकटाच्या या काळात आयआयटी च्या संशोधकांनी बनवलेले हे ॲप एक छोटा प्रयत्न असल्याचे डॉ. जैन म्हणाले आहेत.
या ॲप मध्ये मल्टी-कॅमेरा सपोर्ट, सर्विलांस मॅग्नेटिक डिवाइस, हाल्ट टाइम आणि प्रीसेट ऑटो कॅमेरा क्लिक यांचाही समावेश आहे.
आता ॲपद्वारे शोधता येईल कोरोनाचा रुग्ण, आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे संशोधन
आयआयटी रुडकी येथील सिव्हिल इंजीनियरिंग विभागातील प्राध्यापक डॉ. कमल जैन यांनी एक खास ट्रेकिंग मोबाईल ऍप्लिकेशन बनवले आहे. या ॲपद्वारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ट्रॅक करता येईल.