नवी दिल्ली- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मे महिन्यात होणारी आयआयटी जेईई अॅडव्हान्स परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार 17 मे 2020 रोजी होणार होती.
जेईई अॅडव्हान्स परीक्षेचे 2020 आयोजन आईआईटी दिल्ली यांनी केले आहे. आयआयटी जेईई अॅडव्हान्स परीक्षा देशभरातील 23 आईआईटी, पदवी, पदव्युत्तर आणि इंजिनीअरींग आणि आर्किटेक्टच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा म्हणून घेतली जाते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल टेस्टींग एजन्सीद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. देशभरातील विद्यापीठांच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. संयु्क्त जेईई-मुख्य परीक्षा देखील पुढे गेली आहे.