ETV Bharat / bharat

जम्मू आणि काश्मीरच्या पोलीस महासंचालकानी हडपली जमीन, आयजीपी रथ यांचा गंभीर आरोप - जम्मू आणि काश्मिर

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या एका व्हॉटस्अ‌ॅप गृपवर दिलबाग सिंह यांनी रथ यांना आव्हान दिले की, व्यवसायासाठी किंवा इतर कारणांसाठी एक इंच जमीन माझ्या किंवा माझ्या कुटुंबीयांच्या नावावर आहे का ते दाखवावे. त्यानंतर आयजीपी विजय कुमार यांनी बसंत कुमार यांच्यावर शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवला आहे.

dilbag singh
पोलीस महासंचालक दिलबाग सिंह
author img

By

Published : Jun 14, 2020, 12:44 PM IST

श्रीनगर (जम्मू आणि काश्मिर) - पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांच्यावर बेकायदेशीरपणे जमीन हडपल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. बसंत रथ या आयपीस अधिकाऱ्याने हे आरोप केले आहेत. 2000 सालच्या युपीएससी केडरचे ते अधिकारी आहेत. दिलबाग सिंह नावाच्या ट्वीटर खात्यावरून बसंत रथ यांच्यावर टिप्पणी करण्यात आली होती. यावर प्रत्युत्तर देताना, रथ यांनी हे आरोप केले आहेत. याआधीही रथ हे वादग्रस्त राहिले आहेत.

  • Hi Dilbag Singh. Can I call you Dilloo? Are you the one who owns 50 canals of land in Sarore near the dental college? Is it registered on your name? pic.twitter.com/Zt6vfZipVX

    — Basant بسنت (@KangriCarrier) June 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या प्रकरणानंतर आयपीएस अधिकारी रथ यांच्यावर जम्मू आणि काश्मीर पोलिसांकडून करडी नजर ठेवण्यात येत आहे. दिलबाग सिंह नावाने असलेल्या ट्वीटर खात्यावरून आयजीपी रथ हे लोकांना पुस्तक वाटून समाजाचे ऋण फेडत असल्याचे म्हटले होते. या उत्तर देताना, रथ यांनी लिहिले की, नमस्कार दिलबाग सिंह..! मी तुला दिल्लू म्हणू शकतो? तु तोच आहेस का ज्याने सरोर भागाातील दंतवैद्यकीय महाविद्यलया शेजारी असलेली जमीन हडपली.

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या एका व्हॉटस्अ‌ॅप ग्रुपवर दिलबाग सिंह यांनी रथ यांना आव्हान दिले की, व्यावसायासाठी किंवा इतर कारणांसाठी एक इंच जमीन माझ्या किंवा माझ्या कुटुंबीयांच्या नावावर आहे का ते दाखवावे. त्यानंतर आयजीपी विजय कुमार यांनी बसंत कुमार यांच्यावर शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवला आहे. तसेच जम्मू आणि काश्मिर पोलीस दलाला या माणसाकडून धोका असल्याचे ते म्हणाले आहेत. पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांच्यावर आमचा अभिमान असून, त्यांच्या नेतृत्त्वाखाली जम्मू आणि काश्मिरचे भलं होत असल्याचेही ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.