नवी दिल्ली - लॉकडाऊन आणि नागरिकांच्या हालचालीवर नियंत्रण आणण्यासारखे उपाय कोरोना रोखण्यासाठी खुप महत्त्वाचे आहे. जर आपण हे उपाय राबविले नसते तर 2 लाखांपर्यंत कोरोनाचे रुग्ण भारतात आढळून आले असते, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल म्हणाले आहेत.
देशामध्ये आत्तापर्यंत 7 हजार 447 रुग्ण आढळून आले आहेत. तर 642 जण पूर्णत: बरे झाले आहेत. मागील 24 तासात देशात 1 हजार 35 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 239 रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती आरोगय मंत्रालयाने दिली आहे.
कोरोनाच्या रुग्णांना हाताळण्यासाठी 586 रुग्णालये सज्ज असून 1 लाख आयसोलेशन बेड तयार ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती लव अगरवाल यांनी दिली आहे.
देशभरामध्ये 14 तारखेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, आता देशातील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुशे संचारबंदी वाढणार आहे. अनेक राज्यांनी संचारबंदी वाढविण्याची विनंती पंतप्रधान मोदींना केली आहे. पंजाब आणि आडिशा राज्याने आधीच संचारबंदी वाढविली आहे.