ETV Bharat / bharat

'राम मंदिरासाठी ट्रस्ट, तर मग मशिदीसाठी का नाही?'

author img

By

Published : Feb 19, 2020, 9:36 PM IST

लखनौमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संमेलन आज पार पडले. या संमेलनासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार, आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल उपस्थित होते. दुपारी कार्यक्रमाच्या सुरुवातीला शरद पवार यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला होता. त्यावेळी प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी चर्चा करत, येत्या विधानसभा निवडणुकांसाठी उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी जोरदार तयारीने उतरणार असल्याचे म्हटले होते.

If there's a trust for RAm Mandir, why there isn't one for MAsjid asks NCP chief Sharad Pawar
'राम मंदिरासाठी ट्रस्ट, तर मग मशिदीसाठी का नाही?'

लखनौ - राम मंदिर बांधण्यासाठी ज्याप्रमाणे तुम्ही ट्रस्टची स्थापना केली, त्याप्रमाणे मशीद बांधण्यासाठी ट्रस्ट का नाही बनवू शकत? असा प्रश्न विचारत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ते लखनौमध्ये बोलत होते.

लखनौमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संमेलन आज पार पडले. या संमेलनासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार, आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल उपस्थित होते. दुपारी कार्यक्रमाच्या सुरुवातीला शरद पवार यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला होता. त्यावेळी प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी चर्चा करत, येत्या विधानसभा निवडणुकांसाठी उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी जोरदार तयारीने उतरणार असल्याचे म्हटले होते.

त्यानंतर, रात्री लखनौमधील जनतेला संबोधित करताना शरद पवारांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. जर तुम्ही राम मंदिर बनवण्यासाठी ट्रस्टची स्थापना करू शकता, तर मशिदीसाठी का नाही? हा देश तर सर्वांचा आणि सर्वांसाठी आहे, मग तरीही असा दुजाभाव का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : 'डोनाल्ड ट्रम्प म्हणजे काय प्रभू श्रीराम आहेत काय?'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.