ETV Bharat / bharat

'.. तर गरीबाचा जीव जाईल अन् मध्यमवर्ग हा नवा गरीब असेल'

author img

By

Published : Jun 13, 2020, 8:50 PM IST

प्रत्येक गरीबाच्या हातात तत्काळ 10 हजार रुपये द्या, तसेच पुढील सहा महिने दरमहा 7 हजार 500 रुपये त्यांना कोरोनाच्या काळात द्यावेत, अशी मागणी राहुल गांधी यांनी सरकारकडे केली.

 राहुल गांधी
राहुल गांधी

नवी दिल्ली - कोरोनामुळे देशाची आर्थिक पिछेहाट झाली आहे. अर्थव्यवस्था कमकुवत झाली असून सरकारकडून अर्थव्यवस्था सावरण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान राहुल गांधी यांनी सरकारला अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून इशारा दिला आहे. 'जर सरकारने अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पैसे बाजारात सोडले नाही तर गरीबांचा जीव जाईल, मध्यमवर्ग हा नवा गरीब झालेला असेल आणि भांडवलदार देशाला विकत घेतील, असा इशारा राहुल गांधी यांनी ट्विटरवरून दिला आहे.

खासगी कंपन्यातून कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याच्या अहवालाचा राहुल गांधी यांनी हवाला दिला. प्रत्येक गरीबाच्या हातात तत्काळ 10 हजार रुपये द्या, तसेच पुढील सहा महिने दरमहा 7 हजार 500 रुपये त्यांना कोरोनाच्या काळात द्यावेत, अशी मागणी राहुल गांधी यांनी सरकारकडे केली.

लघु आणि मध्यम उद्योगांना उभारी देण्यासाठी आर्थिक पॅकेज घोषित करण्याची मागणी त्यांनी केली. कोरोनामुळे लघु उद्योगांना तोटा झाला आहे. त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी त्यांच्या हातात पैसे देण्याची गरज आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

उद्योगधंद्याच्या उत्पादनाचा इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन (IIP) अहवालही सरकारने थांबून धरला आहे. एप्रिल महिन्याची उत्पादनाची आकडेवारी समोर आली नाही. कोरोनामुळे आधीच्या महिन्यांच्या आकडेवारीशी तुलना केली जाऊ शकत नाही, असे सरकारचे म्हणणे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.