ETV Bharat / bharat

'सत्तेत आल्यास माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांना 10 वीची परीक्षा पास करण्यासाठी मदत करू' - बिहार विधानसभा निवडणूक लेटेस्ट न्यूज

भाजपाचे प्रदेश अध्यक्ष अध्यक्ष संजय जैस्वाल यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर बोचरी टीका केली आहे.

संजय जैस्वाल
संजय जैस्वाल
author img

By

Published : Oct 30, 2020, 7:22 PM IST

पाटणा - बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. नेत्यांकडून एकमेंकावर आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झडत आहेत. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष संजय जैस्वाल यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर बोचरी टीका केली आहे. 'जर आम्ही सत्तेत आलो तर, माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांना 10 वीची परीक्षा पास करण्यासाठी मदत करू', अशी टीका संजय जैस्वाल यांनी केली.

मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना सायकल, पुस्तके, गणवेशाचे वाटप केले. मात्र, दोन मुख्यमंत्री ( लालू प्रसाद-राबडी देवी) त्यांच्या मुलांना 10 वी पास करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकले नाही. त्यामुळे आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर, माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांना 10 वीची परीक्षा पास करण्यासाठी मदत करू, अशी टीका संजय जैस्वाल यांनी केली.

तेजस्वी यादव यांनी एका प्रचार सभेला संबोधीत करताना, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली होती. नितिश कुमार यांनी राज्यातील शैक्षणिक आणि आरोग्य व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे, असे ते म्हणाले होते.

निकाल 10 नोव्हेंबरला -

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील 71 जागेसाठी मतदान पार पडले आहे. दुसऱ्या टप्प्याचे मतदान 3 नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्याचे मतदान 7 नोव्हेंबरला होणार आहे. तर मतमोजणी ही 10 नोव्हेंबरला होणार आहे. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे 123 जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. येत्या 10 तारखेला कोणता पक्ष कोणाला मात देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.