ETV Bharat / bharat

'पंतप्रधान मोदी आता हल्लेखोराला कपड्यांवरून ओळखा' - @asadowaisi

एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.

ओवेसी यांनी पंतप्रधाओवेसी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोलन मोदींवर हल्लाबोल
ओवेसी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
author img

By

Published : Jan 30, 2020, 9:20 PM IST

नवी दिल्ली - जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या मोर्चादरम्यान एका तरुणाने गोळीबार केला. त्यामध्ये एक विद्यार्थी जखमी झाला आहे. त्यावरून एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आता या तरुणाला त्यांच्या कपड्यावरून ओळखा', असे ओवेसींनी टि्वट करून म्हटले आहे.

'केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह सभेतील इतर सर्व उपस्थितांचे आभार. देशामध्ये एवढा द्वेष निर्माण केला की, एका दहशतवाद्याने पोलिसांसमोर विद्यार्थ्यांवर गोळीबार केला. आता मोदींनी हल्लेखोराला कपड्यावरून ओळखावे', असे टि्वट ओवेसी यांनी केले.केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीतील आपल्या प्रचारसभेमध्ये वादग्रस्त वक्तव्य केले होते. ठाकूर यांनी सभेत 'देश के गद्दारोंको...अशी घोषणा दिली होती, त्यांच्या या घोषनेनंतर उपस्थितांनी 'गोली मारो *** को' असे नारे दिले होते. त्यावरून ओवेसींनी अनुराग ठाकूर यांच्यावर टीका केली आहे.पंतप्रधान मोदी यांनीही यापूर्वी सीएए विरोधकांवर तोफ डागली होती. 'हे विरोधक कोण आहेत ते त्यांच्या कपड्यांवरून ओळखा,' असं मोदी म्हणाले होते. त्यावरून वादंग माजले होते.

Intro:Body:

'पंतप्रधान मोदी आता हल्लेखोराला कपड्यांवरून ओळखा'

नवी दिल्ली - जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या मोर्चादरम्यान एका तरुणाने गोळीबार केला. त्यामध्ये एक विद्यार्थी जखमी झाला आहे. त्यावरून एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आता या तरुणाला त्यांच्या कपड्यावरून ओळखा', असे ओवेसींनी टि्वट करून म्हटले आहे.

'केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह सभेतील इतर सर्व उपस्थितांचे आभार. देशामध्ये एवढा द्वेष निर्माण केला की, एका दहशतवाद्याने पोलिसांसमोर विद्यार्थ्यांवर गोळीबार केला. आता मोदींनी हल्लेखोराला कपड्यावरून ओळखावे', असे टि्वट ओवेसी यांनी केले.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीतील आपल्या प्रचारसभेमध्ये वादग्रस्त वक्तव्य केले होते. ठाकूर यांनी सभेत 'देश के गद्दारोंको...अशी घोषणा दिली होती, त्यांच्या या घोषनेनंतर उपस्थितांनी 'गोली मारो *** को' असे नारे दिले होते. त्यावरून ओवेसींनी अनुराग ठाकूर यांच्यावर टीका केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनीही यापूर्वी सीएए विरोधकांवर तोफ डागली होती. 'हे विरोधक कोण आहेत ते त्यांच्या कपड्यांवरून ओळखा,' असं मोदी म्हणाले होते. त्यावरून वादंग माजले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.