ETV Bharat / bharat

पाकिस्तानला 'जोर का झटका'; कुलभूषण प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल भारताच्या बाजूने - Kulbhushan Jadhav

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी संयुक्त राष्ट्रांचे हेग येथे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल भारताच्या बाजूने (ICJ) लागला आहे. न्यायालयाने कुलभूषण यांना दिलासा दिला आहे.

कुलभूषण जाधव
author img

By

Published : Jul 17, 2019, 6:34 PM IST

Updated : Jul 18, 2019, 6:41 AM IST

हेग - भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी संयुक्त राष्ट्रांच्या द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल भारताच्या बाजूने लागला आहे. न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगती दिली आहे. न्यायालयाच्या या निकालाने कुलभूषण यांना मोठा दिलासा दिला आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायाधीशांनी कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगती दिली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात 16 न्यायाधीश आहेत. 16 न्यायाधीशांपैकी 15 न्यायाधीशांनी भारताच्या बाजूने निकाल दिला आहे. आयसीजेमध्ये भारताच्या बाजूने ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी बाजू मांडली होती.

फाशीला स्थगिती
कुलभूषण यांच्या अटकेची माहिती भारताला न दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला खडसावले. पाकिस्तानच्या फाशीच्या निर्णयावर पूर्ण विचार होणार असून भारताला कॉन्सीलर अॅक्सीस देण्यात आला आहे. जोपर्यंत या शिक्षेचा पुनर्विचार होत नाही तोपर्यंत त्यांना दिलेली फाशीची शिक्षा स्थगित करण्यात येत असल्याचा आदेश यावेळी आंतरराष्ट्रीय न्यायाधिशांनी दिला आहे. याचबरोबर पाकिस्तानने व्हिएन्ना करारातील अटींचे उल्लंघन केल्याचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने म्हटले आहे. कुलभूषण यांना कायदेशीर मदत आणि त्यांचे राजनैतिक अधिकार कायम ठेवण्याचे आदेश न्यायालयाने पाकिस्तानला दिले आहेत.

  • Reema Omer, International Legal Advisor,South Asia:Court has also said Jadhav’s death sentence should remain suspended until Pakistan effectively reviews& reconsiders the conviction/sentence in light of Pakistan’s breach of Art 36(1) ie denial of consular access and notification https://t.co/uSRwEmymNz

    — ANI (@ANI) July 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारतात जल्लोषाचे वातावरण

  • जाधव यांना न्याय मिळेल. प्रत्येक भारतीयाच्या सुरक्षे आणि कल्याणासाठी सरकार काम करत राहणार आहे, असे नरेंद्र मोदी यांनी टि्वट करुन म्हटले आहे.
    • We welcome today’s verdict in the @CIJ_ICJ. Truth and justice have prevailed. Congratulations to the ICJ for a verdict based on extensive study of facts. I am sure Kulbhushan Jadhav will get justice.

      Our Government will always work for the safety and welfare of every Indian.

      — Narendra Modi (@narendramodi) July 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • अमित शाह यांनी हा विजय सत्या आणि मानवतेचा झाला आहे, असे म्हटले आहे.
    • A great day at the @CIJ_ICJ! The verdict is a victory of truth and protects human dignity.

      It is yet another manifestation of Modi Government’s diplomatic efforts and commitment to protect all Indians.

      I congratulate Harish Salve ji for his stupendous efforts through the case.

      — Amit Shah (@AmitShah) July 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • सुषमा स्वराज यांनी हरीष साळवे यांचे आभार मानले आहेत.
    • I thank Mr.Harish Salve for presenting India's case before ICJ very effectively and successfully. /3

      — Sushma Swaraj (@SushmaSwaraj) July 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • भारताच्या बाजुने निकाल लागल्यामुळे कुलभूषण यांच्या मित्रांनी आनंद साजरा केला आहे.
  • आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या कॉन्सीलर अॅक्सीसचे स्वागत आहे. भारताचा हा विजय ऐतिहासीक आहे, असे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
    • The ICJ’s verdict on Kulbhushan Jadhav is big victory for India. The ICJ directing Pakistan to grant consular access to Jadhav and asking them to review the conviction and the sentence is a welcome decision.

      It is also a big win for PM Sh.@narendramodi’s diplomatic initiative.

      — Rajnath Singh (@rajnathsingh) July 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • हेग येथील न्यायालयाने भारताच्या बाजूने निकाल दिला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे.
  • आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले आहे.
    • I welcome the ICJ verdict.

      My thoughts tonight are with #KulbhushanJadhav , alone in a prison cell in Pakistan & with his distraught family for whom this verdict brings a rare moment of relief, joy & renewed hope, that he will one day be free to return to his home in India 🇮🇳

      — Rahul Gandhi (@RahulGandhi) July 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • लंडनमध्ये हरीष साळवे यांनी पाकिस्तानने जर कुलभूषण यांनी निपक्ष सुनावणी देण्यात अपयशी ठरले तर आम्ही पुन्हा ICJ मध्ये जाऊ, असे लंडनमध्ये माध्यमांशी बोलताना हरीष साळवे म्हणाले आहेत.
    • Harish Salve: We expect Pakistan to do whatever it has to do including appropriate legislative measures to guarantee a fair trial. So Pakistan's conduct is under watch and if what they do is another farcical attempt, we will be back in the Court. pic.twitter.com/sOct13xs33

आंतरराष्ट्रीय न्यायालयात 16 न्यायाधीशांचे पॅनल

आंतरराष्ट्रीय न्यायालयात 16 न्यायाधीश आहेत. संयुक्त राष्ट्र महासभा आणि सुरक्षा परिषद हे न्यायाधिशांची निवड करतात. 9 वर्षाच्या कार्यकाळासाठी त्यांची निवड केली जाते. प्रत्येक तिसऱ्या वर्षी या 16 न्यायाधिशांपैकी पाज जण पुन्हा निवडता येतात. यामध्ये दोन न्यायाधीश हे एकाच देशातून निवडता येत नाहीत अशी अट आहे. स्लोवाकियाचे न्यायधीश पीटर टॉमका हे कुलभूषण जाधव खटल्यातील आंतरराष्ट्रीय कोर्टातील पॅनलमधील वरिष्ठ न्यायधीश आहेत.

3 मार्च २०१६ ला कुलभूषण यांना अटक
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्कराने 3 मार्च २०१६ मध्ये तथाकथित हेरगिरीच्या आरोपावरून पकडले होते. तसेच, कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय परस्पर फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताने या प्रकरणी पाकिस्तानची एकतर्फी भूमिका तसेच, कारवाई करण्यावरून आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणली होती.

व्हिएन्ना करार नेमका आहे काय?
व्हिएन्ना करार 1961 साली ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे करण्यात आला होता. या करारानुसार एका देशाचे राजदूत दुसऱ्या देशात कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि भीतीशिवाय काम करु शकतात. याअंतर्गत राजदुतांना अनेक अधिकार देण्यात आले आहेत. राजदुतांवर परदेशात गुन्हाही दाखल केला जाऊ शकत नाही. 2018 पर्यंत 192 देशांनी या कराराला मान्यता दिली आहे. एकूण 52 कलमी हा करार असून राजनैतिक अधिकाऱ्यांच्या अधिकाराची आणि सवलतींची माहिती या करारात नमूद करण्यात आली आहे. 15 ऑक्टोबर 1965 साली भारताने या कराराला संमती दिली होती.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 18, 2019, 6:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.