ETV Bharat / bharat

आंध्राला विशेष दर्जा प्राप्त करुन घेण्यासाठी मोदींना ५० वेळा भेटेन - जगनमोहन रेड्डी

देवाची इच्छा असेल तर पुढील ५ वर्षात ३०, ४० किंवा ५० वेळा मोदींना भेटण्याची तयारी आहे. मी मोदींना भेटीत आंध्राला विशेष दर्जा मिळणे किती गरजेचे आहे. याबाबत मी अमित शाह यांच्यासोबतही चर्चा केली आहे, असे जगनमोहन रेड्डी म्हणाले.

जगनमोहन रेड्डी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : May 26, 2019, 8:55 PM IST

नवी दिल्ली - वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी म्हणाले, पुढील ५ वर्षात आंध्रप्रदेशला विशेष दर्जा प्राप्त करुन देण्यासाठी नरेंद्र मोदींची ५० वेळा भेट घेण्याची तयारी आहे.

मोदींची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मोदी म्हणाले, आज मोदींसोबत माझी पहिली भेट झाली. देवाची इच्छा असेल तर पुढील ५ वर्षात ३०, ४० किंवा ५० वेळा मोदींना भेटण्याची तयारी आहे. मी मोदींना भेटीत आंध्राला विशेष दर्जा मिळणे किती गरजेचे आहे, हे सांगितले आहे. मी भाजप अध्यक्ष अमित शाह यांचीही याबाबत भेट घेतली असून त्यांनाही याबद्दलचे महत्व पटवून दिले आहे. सद्या परिस्थिती वेगळी आहे. भाजप स्वबळावर सत्तेत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचे २५० खासदार निवडुण आले असते आम्ही आंध्राला विशेष दर्जा देण्याचा अटीवर त्यांना पाठींबा दिला असता.

आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूबद्दल बोलताना जगनमोहन रेड्डी म्हणाले, २३ मे रोजी निकाल घोषित झाले आणि त्यांचे २३ उमेदवारच निवडून आले. ही सर्व देवाने लिहिलेली पटकथा आहे. मी तुम्हाला आश्वासित करतो, आमचे सरकार क्रांतिकारक असणार आहे. येत्या ६ महिन्यात किंवा १ वर्षात देशभरात आम्ही एक उदाहरण प्रस्थापित करू.

वायएसआर काँग्रेसने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन करताना १७५ पैकी १५१ जागांवर विजय मिळवला आहे. तर, सत्तेत असलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगु देसम पक्षाला अवघ्या २३ जागा मिळाल्या आहेत. वायएसआर काँग्रेसने लोकसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी करताना २५ पैकी २२ जागा जिंकल्या आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.