ETV Bharat / bharat

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची प्रकृती स्थिर; कोरोना वॉरिअर्संना केला सलाम - मध्यप्रदेश मुख्यमंत्री कोरोना

'कोरोनाला घाबरण्यापेक्षा आपण सर्वांनी त्याचा आत्मविश्वासाने सामना करायला हवा. सर्वांनी एकमेकांमध्ये अंतर ठेवायला हवे. याबरोबरच हात धुणे आणि मास्क घालणे, ही कोरोनाशी लढा देण्याची शस्त्रे आहेत. सर्वांनी या शस्त्रांचा वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जनतेला केले.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 26, 2020, 3:47 PM IST

भोपाळ - मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर शहरातील चिरायू रुग्णालयात उपचार सुुरु आहेत. आज(रविवार) त्यांनी ट्विटवरून त्यांनी आपल्या प्रकृतीची माहिती दिली. ‘मी ठीक असून राज्यातील कोरोना वॉरिअर्सला सलाम’, असे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

शिवराज सिंह चौहान यांना काल (शनिवार) कोरोनाची लागण झाली. त्यानंतर आज त्यांनी नागरिकांना ट्विटरद्वारे प्रकृतीची माहिती दिली. तसेच कोरोना व़ॉरिअर्सचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. 'मित्रांनो मी ठीक असून कोरोना योद्ध्यांचे कामाप्रती समर्पण प्रशंसनीय आहे. कोरोना बाधितांचे उपचार करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना माझा सलाम. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ते निस्वार्थीपणे रुग्णांची सेवा करत आहेत, असे ट्विट चौहान यांनी केले.

'कोरोनाला घाबरण्यापेक्षा आपण सर्वांनी त्याचा आत्मविश्वासाने सामना करायला हवा. सर्वांनी एकमेकांमध्ये अंतर ठेवायला हवे. याबरोबरच हात धुणे आणि मास्क घालणे, ही कोरोनाशी लढा देण्याची शस्त्रे आहेत. सर्वांनी या शस्त्रांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. याबरोबरच कोरोना झाला तर घाबरु नका, आरोग्य अधिकाऱ्यांना तत्काळ कळवा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना ट्विटरवरून केले.

'जर तुमच्यात कोरोनाची लक्षणे दिसत असतील तर घाबरु नका. लक्षणेे लपवू नका. तत्काळ आरोग्य कर्मचाऱ्यांना कळवा, त्यामुळे उपचार सुरु करता येतील. वेळेवर उपचार केल्याने तुम्ही बरे व्हाल. काळजी घ्या, असा संदेश त्यांनी ट्विटरद्वारे नागरिकांना दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.