ETV Bharat / bharat

'भारतातील घुसखोरांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल' - TMC MLA Sabyasachi Dutta

तृणमूल काँग्रेसचे आमदार सब्यसाची दत्ता यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये एनआरसी लागू होण्याचे संकेत दिले आहेत.

पश्चिम बंगाल एनआरसी
author img

By

Published : Oct 1, 2019, 5:39 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये एनआरसी लागू होऊ देणार नाही, असे दिदी (ममता बॅनर्जी) म्हणत आहेत. मात्र, मी तुम्हाला खात्री देतो, की भारतातील प्रत्येक घुसखोरांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज कोलकात्यामध्ये बोलताना हे स्पष्ट केले.

  • Amit Shah: Didi(Mamata Banerjee) is saying will not let NRC happen in West Bengal, but I am assuring you, each and every infiltrator in India will be shown the door. You know when she was in opposition&Left was in power, she used to say infiltrators must be forced to leave India. https://t.co/wjtPCmOExA pic.twitter.com/kkDihMDik7

    — ANI (@ANI) October 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यासोबतच, जेव्हा डावी आघाडी सत्तेत होती आणि त्या विरोधी पक्षात होत्या, तेव्हा त्याही घुसखोरांना भारताबाहेर काढण्याची भाषा करत होत्या, असे सांगत त्यांनी ममता बॅनर्जींना टोला लगावला आहे. मी हिंदू, शीख, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन धर्मीय निर्वासितांना ही खात्री देतो, की त्यांना भारतातून बळजबरी बाहेर काढले जाणार नाही. एनआरसी लागू करण्याआधी आम्ही 'नागरिकत्व दुरुस्ती विधेयक' लागू करणार आहोत. याद्वारे निर्वासित लोकांना भारतीय नागरिकत्व मिळवण्यास मदत होईल, असेही शाह यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : चोवीस तासांच्या आत पाकिस्तानकडून दोनदा शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान जखमी

यावेळी बोलताना शाह म्हणाले, पश्चिम बंगाल आणि कलम ३७० यांचे विशेष नाते आहे. कारण, बंगालच्या मातीत जन्मलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांनीच 'एक निशाण, एक विधान और एक प्रधान' अशी घोषणा केली होती.

  • BJP President Amit Shah in Kolkata: West Bengal and article 370 have a special connection, because it was the son of this soil, Syama Prasad Mukherjee ji who raised the slogan 'Ek Nishan, Ek Vidhan aur Ek Pradhan' pic.twitter.com/eUuSwm1wz0

तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि बिधाननगरचे माजी नगराध्यक्ष सब्यसाची दत्ता यांनी आज अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी अमित शाह बोलत होते.

हेही वाचा : कलम ३७० : मोदींनी घेतलेल्या निर्णयाच्या घटनात्मक वैधतेवर होणार १४ नोव्हेंबरला सुनावणी

Intro:Body:

'भारतातील घुसखोरांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल'

तृणमूल काँग्रेसचे आमदार सब्यसाची दत्ता यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये एनआरसी लागू होण्याचे संकेत दिले आहेत.

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये एनआरसी लागू होऊ देणार नाही, असे दिदी (ममता बॅनर्जी) म्हणत आहेत. मात्र, मी तुम्हाला खात्री देतो, की भारतातील प्रत्येक घुसखोरांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज कोलकात्यामध्ये बोलताना हे स्पष्ट केले.

 यासोबतच, जेव्हा डावी आघाडी सत्तेत होती आणि त्या विरोधी पक्षात होत्या, तेव्हा त्याही घुसखोरांना भारताबाहेर काढण्याची भाषा करत होत्या असे सांगत त्यांनी ममता बॅनर्जींना टोला लगावला आहे. मी हिंदू, शीख, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन धर्मीय निर्वासितांना ही खात्री देतो, की त्यांना भारतातून बळजबरी बाहेर काढले जाणार नाही. एनआरसी लागू करण्याआधी आम्ही 'नागरिकत्व दुरुस्ती विधेयक' लागू करणार आहोत. याद्वारे निर्वासित लोकांना भारतीय नागरिकत्व मिळवण्यास मदत होईल, असेही शाह यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना शाह म्हणाले, पश्चिम बंगाल आणि कलम ३७० यांचे विशेष नाते आहे. कारण, बंगालच्या मातीत जन्मलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांनीच 'एक निशान, एक विधान और एक प्रधान' अशी घोषणा केली होती.

तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि बिधाननगरचे माजी नगराध्यक्ष सब्यसाची दत्ता यांनी आज अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी अमित शाह बोलत होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.