ETV Bharat / bharat

'हायड्रोक्सिक्लोरोक्वाईन'वरील निर्यातबंदी केली शिथील; इतर देशांनाही देणार औषधाचा परवाना.. - हायड्रोक्सिक्लोरोक्वाईन परवाना

कोरोना विषाणू जगभरात थैमान घालत आहे. या विषाणूवर सध्या कोणतेही औषध उपलब्ध नाही. मात्र काही चाचण्यांमध्ये असे आढळून आले आहे, की हायड्रोक्सिक्लोरोक्वाईन या मलेरियाच्या औषधाचा कोरोनाच्या रुग्णांवरही चांगला परिणाम दिसून येत आहे.

Hydrochloroquine & paracetamol export ban partially lifted
'हायड्रोक्लोरोक्वाईन'वरील निर्यातबंदी केली शिथील; इतर देशांनाही देणार औषधाचा परवाना..
author img

By

Published : Apr 7, 2020, 11:12 AM IST

Updated : Apr 7, 2020, 12:30 PM IST

नवी दिल्ली - 'हायड्रोक्सिक्लोरोक्वाईन' या औषधावरील निर्यातबंदी शिथील करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ज्या देशांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे, अशा काही देशांना भारत हे औषध पुरवणार आहे असे सरकारने जाहीर केले आहे. यासोबतच या प्रकरणाचे राजकारण करण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांनाही देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने खडसावले आहे.

  • We will also be supplying these essential drugs to some nations who have been particularly badly affected by the pandemic. We would therefore discourage any speculation in this regard or any attempts to politicise the matter: Ministry of External Affairs (MEA) #COVID19 https://t.co/T4BPoXkLDM

    — ANI (@ANI) April 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोरोना विषाणू जगभरात थैमान घालत आहे. या विषाणूवर सध्या कोणतेही औषध उपलब्ध नाही. मात्र काही चाचण्यांमध्ये असे आढळून आले आहे, की हायड्रोक्सिक्लोरोक्वाईन या मलेरियाच्या औषधाचा कोरोनाच्या रुग्णांवरही चांगला परिणाम दिसून येत आहे. देशात या औषधाचा साठा उपलब्ध आहे. मात्र देशाची लोकसंख्या पाहता भविष्याचा विचार करून या औषधाच्या निर्यातीवर केंद्राने बंदी आणली होती.

मात्र, जगभरातील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता, इतर देशांच्या मदतीसाठी भारत पुढे सरसावला आहे. औषधे पुरवण्यासोबतच, जे देश स्वतः हे औषध तयार करण्यास सक्षम आहेत, त्यांना याचा परवाना देण्याचाही निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पॅरासिटीमॉल आणि हायड्रोक्सिक्लोरोक्वाईन या दोन्ही औषधांचा परवाना भारत अशा ठराविक देशांना देणार आहे.

हेही वाचा : १४ एप्रिलनंतरही लॉकडाऊन कायम ठेवा; तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांची मागणी..

Last Updated : Apr 7, 2020, 12:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.