ETV Bharat / bharat

'वर्क फ्रॉम होम' करताना 'ही' खबरदारी घ्या

कार्यालयाऐवजी घरी बसून आपले काम कसे करायचे यासंबंधी आम्ही तुम्हाला काही टीप्स देणार आहोत. दिवसभराचे शेड्यूल कसे सांभाळायचे आणि आपला पोशाख कसा ठेवायचा याबाबत काही नियम आहेत ज्यामुळे आपली कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.

how to-get-into-working-mode-while-at-home
'वर्क फ्रॉम होम' करताना 'ही' खबरदारी घ्या
author img

By

Published : Mar 30, 2020, 7:52 PM IST

सध्या लॉकडाऊन वर्क फ्रॉम होमचे प्रकार वाढलेले आहेत. कार्यालयाऐवजी घरी बसून आपले काम कसे करायचे यासंबंधी आम्ही तुम्हाला काही टीप्स देणार आहोत. दिवसभराचे शेड्यूल कसे सांभाळायचे आणि आपला पोशाख कसा ठेवायचा याबाबत काही नियम आहेत ज्यामुळे आपली कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, असे नुकतेच एका अहवालाने सूचवले आहे.

नियोजन आणि व्यवस्थापन सल्लागार क्षेत्रातील जागतिक पातळीवरील 'बेन अँड कंपनी'ने वर्क फ्रॉम होमसाठी काही गोष्टी सुचवल्या आहेत.

सामान्यपणे काम करतानाचे शेड्यूल पाळा

ऑफिससाठी ज्यावेळेला झोपेतून उठतो त्याचवेळेला आताही उठा

आपल्या ठरलेल्या वेळेलाच अंघोळ करून तयार व्हा

न्याहारी करून कामाला लागा

कार्यालयीन कामकाज करताना तुमचे व्यक्तिगत कामे करू नका

व्यक्तिगत महत्त्वाचे काम असेल तर दुसऱ्या खोलीत जाऊन करा

वरील नमूद केलेल्या गोष्टी पाळल्या तर वर्क फ्रॉम यशस्वी होईल, असे 'बेन अँड कंपनी'ने सूचवले आहे.

घरून काम करत असताना छोटे छोटे ब्रेक घ्या. यावेळेत तुम्ही सोशल मीडिया चेक करू शकता. जेवणासाठी ४५ मिनिटांचा ब्रेक घेणं उत्तम ठरेल.

घरी बसून काम करत असलात तरी कार्यालयीन वेळेत कुठलेही घरकाम करू नका

संपूर्ण अपार्टमेंट किंवा घर कामासाठी वापरण्याऐवजी एखादी खोली कामासाठी निवडा. कामाच्या ठिकाणी जेवणं घेणे टाळा.

वर्क फ्रॉम होम करत असताना तुम्हाला कोणी सहकारी असेल तर काही नियम ठरवून घ्या. कोणालाही अडचण येणार नाही अशी वागणूक ठेवा.

कामासाठी उत्तम जागा आणि अचूक कनेक्टिव्हिटी काम आणखी प्रभावशाली करण्यास मदत करेल, असे 'बेन अँड कंपनी'ने सूचवले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.