ETV Bharat / bharat

गोवा देशातील पहिलं कोरोनामुक्त राज्य; 'या' उपाययोजनामुळे महामारीवर मात

गोव्यात 25 मार्च ते 3 एप्रिल या काळात 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तर 19 एप्रिलपर्यंत या सातही रुग्णांवर यशस्वी उपचार करून घरी सोडून देण्यात आले.

goa corona free
प्रमोद सांवत रुग्णांची तपासणी करताना
author img

By

Published : May 1, 2020, 8:57 PM IST

पणजी - देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना गोवा राज्याने सर्वांपूढे आदर्श ठेवला आहे. राज्यात ७ कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. हे सातही रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सरकारने राबवलेल्या प्रवाभी उपाययोजना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या अविरत परिश्रमामुळे राज्य कोरोनामुक्त झाले आहे.

जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याच्या बातम्या येत होत तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामाला प्रशासन लागले होते. आरोग्य मंत्री राणे सातत्याने गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य संचालक डॉ. ज्यो डिसा आणि अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी यांच्याशी सातत्याने चर्चा करून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेत होते. त्यानंतर उपाययोजनांची अंमलबजावणी करताना राज्याच्या अखत्यारितील सार्वजनिक उपक्रमांमध्ये जागृती सुरु करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विमान प्रवाशांची विमानतळावरच तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे होमक्वारंटाईन असलेल्यांची संख्या वाढली. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वेळीच शोधून त्यावर यशस्वी उपचार करणे शक्य झाले. त्यामुळे प्रसारही आटोक्यात आणण्यात यश आले.

गोव्यात 25 मार्च ते 3 एप्रिल या काळात 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तर 19 एप्रिलपर्यंत या सातही रुग्णांवर यशस्वी उपचार करून घरी सोडून देण्यात आले. स्व:त डॉक्टर असलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या वाढदिवशी म्हापसा येथील आझिलो इस्पितळात रुग्ण तपासणी केली. त्यांच्या या कृतीमुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह संचारला. रुग्णांची तपासणी करत त्यांनी डॉक्टरांप्रती संवेदना जागविल्या. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी अन्न आणि औषध प्रशासन, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे अविरत परिश्रमासाठी आभार मानले.

गोवा सरकारने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राबविलेल्या उपाययोजना

1) चोविस तास हेल्पलाईन -

गोवा सरकारने 104 या हेल्पलाईन बरोबरच सर्वप्रथम ' कोबोट- 19' (+917948058218) हा व्हॉट्सअ‌ॅप क्रमांक देशात पहिल्यांदा उपलब्ध दिला. त्यानंतर 'टेस्ट युवरसेल्फ गोवा' हे अ‌ॅप सनफ्रान्सिस्को अमेरिका येथील इनोव्हेसर कंपनीच्या मदतीने नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिले.

2) संचारबंदीची प्रभावी अमंलबजावणी

जेव्हा कोरोना संसर्ग पसरत होता तेव्हा शिगमोत्सव सुरु होता. गोव्यात जिल्हा पंचायतींसाठी निवडणूक प्रचारही सुरू होता. परंतु, सरकारने तत्काळ लोकांना एकत्रित जमण्यास मज्जाव करत सार्वजनिक कार्यक्रम बंदी घातली. तर निवडणूक पुढे ढकलली. कलम 144 लागू करत मुक्त संचारबंदी लागू केली.

3) जनता कर्फ्यू वाढविला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू जाहीर केला. त्याला गोव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तयाबरोबरच गोवा सरकारने पुढील तीन दिवस तो वाढविला आणि दि. 24 रोजी पंतप्रधानांनी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला. जेव्हा पंतप्रधानांनी याचा आढावा घेतला तेव्हा गोवा सरकारने आपला लेखी अहवाल सादर करताना लॉकडाऊन वाढविण्याची शिफारस केली होती.

4) राज्याच्या सीमांवर कडक बंदोबस्त

गोव्याच्या सीमेवर महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्ये आहेत. तेथूनच जीवनावश्यक वस्तूंची राज्यात येतात. परंतु, लॉकडाऊन काळात सीमा पूर्ण सील करण्यात आल्या. तसेच या ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलीस निरीक्षक, आरोग्य कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना तैनात केले.

5) गोव्यात व्हायरॉलॉजी लॅब सुरू

गोवा सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत गोव्यात व्हायरलॉजी प्रयोगशाळा सुरू केली. ज्यामुळे संभाव्य रुग्णांची कोरोना चाचणी तत्काळ आणि विनाविलंब शक्य झाली. तत्पूर्वी संभाव्य रुग्णांचे वैद्यकीय नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे लागत होते. राज्यात सुविधा उपलब्ध झाल्याने निर्णय घेण्यातील विलंब टाळण्यात आला.

6) सार्वजनिक आरोग्य सर्व्हे

सरकारने लॉकडाऊन काळात गोमंतकीयांचा आरोग्य सर्व्हे केला. ज्याचा अहवाल सरकारला तत्काळ सादर करण्यात आला. तसेच चोविसतास वैद्यकीय सल्ल्यासाठी 916366449060 हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. दोनशे पेक्षा जास्त सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझेशन करण्यात आले. प्राथमिक लक्षणे तपासण्यासाठी १ हजार थर्मलगन( व्यक्तीच्या शरिराचे तापमान तपासण्याचे यंत्र) विकत घेण्यात आल्या. या काळात गोव्यात अडकलेल्या 6 हजार 313 विदेशी नागरिकांना विशेष विमानाने मायदेशी पाठविण्यात आले.

7) राज्य कार्यकारी समितीकडून विविध कामांचा सतत आढावा घेतला जात आहे. तर मुख्यमंत्री डॉ. सावंत माध्यमाना इत्यंभूत माहिती देत आहेत.

8) राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती काय आहे?

दि. 29 जानेवारीपासून दि. 30 एप्रिलपर्यंत गोव्यातील कोविड-19 ची स्थिती

होम क्वारंटाईन - 1794

फॅसिलिटी क्वारंटाईन - 430

हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये - 197

नमुना तपासणी- 2031

अहवाल प्राप्त - 2018

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण- 7

यशस्वी उपचारानंतर घरी सोडलेले - 7

मृत्यू - ०

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.