ETV Bharat / bharat

'गांधीजींनी आत्महत्या कशी केली?' शाळेच्या परीक्षेतील प्रश्न - गांधीजींनी आत्महत्या कशी केली?'

'गांधीजींनी आत्महत्या कशी केली?' असा या प्रश्नाचा अनुवाद करण्यात आल्यामुळे हा वाद निर्माण झाला. गांधीजींच्या मनात आत्महत्येचा विचार आला होता, याविषयी माहिती उपलब्ध आहे.

गांधीजी
author img

By

Published : Oct 14, 2019, 5:24 PM IST

नवी दिल्ली - गुजरातमधील एका शाळेत महात्मा गांधीजींविषयी विचारलेल्या प्रश्नामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. 'महात्मा गांधीजींनी आत्महत्येचा प्रयत्न कसा केला' हा प्रश्न गुजरातमधील ९ वीच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत परीक्षेत विचारण्यात आला होता. 'सुफलाम शाला विकास संकुल' या बॅनरअंतर्गत संचलित शाळांच्या परीक्षेत हा प्रश्न विचारण्यात आला होता.

'गांधीजींनी आत्महत्या कशी केली?' असा या प्रश्नाचा अनुवाद करण्यात आल्यामुळे हा वाद निर्माण झाला. गांधीजींच्या मनात आत्महत्येचा विचार आला होता, याविषयी माहिती उपलब्ध आहे.

'गांधीजींना लहानपणी त्यांच्या नातेवाईकासह बीडी पिण्याची सवय लागली होती. मात्र, त्यांच्याकडे फारसे पैसे नसत. त्यामुळे त्यांनी नोकराच्या खिशातून पैसे चोरण्यास सुरुवात केली. मात्र, ही सवय लागल्यानंतर गांधीजींना आपण कोणतेच काम स्वतः करू शकत नसल्याची जाणीव झाली. त्यामुळे त्यांना नैराश्य येऊन त्यांनी आत्महत्येचा विचार केला. यादरम्यानच त्यांना धोत्र्याचे बी विषारी असून ते खाल्ल्याने मृत्यू होतो, हे माहिती झाले. त्यांनी ते या बिया घेऊन जंगलात आले. मात्र, त्यांची त्या बिया खाण्याची हिंमत झाली नाही,' अशी घटना आहे. मात्र, प्रश्नाचा अनुवाद चुकीचा झाल्याने हा वाद निर्माण झाला.

हेही वाचा - सर्वोच्च न्यायालयात अयोध्या प्रकरणी सुनावणी सुरू, मुस्लीम पक्ष मांडताहेत बाजू

याशिवाय, 12 वीच्या एका परीक्षेत 'येथे दारूविक्रीतील वाढ आणि उपद्रवाविषयी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार करण्यासाठी पत्र लिहा,' असा प्रश्न विचारण्यात आला होता. प्रत्यक्षात गुजरातमध्ये दारूबंदी असूनही हा प्रश्न विचारला याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सुफलाम शाला विकास संकुल ही संस्था काही प्रमाणात स्वखर्चाने आणि काही प्रमाणात गांधीनगरमध्ये सरकारी अनुदानावर चालू असलेल्या शिक्षण संस्थांपैकी एक आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - 'दिल्लीतील हवा चांगलीच होती; बाहेरच्या राज्यांमधून येणाऱ्या धुरामुळे होत आहे प्रदूषण'

Intro:Body:

----------------------

'गांधीजींनी आत्महत्या कशी केली?' शाळेच्या परीक्षेतील प्रश्न

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.